G20 Summit 2023 : जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात आले आहेत. बायडन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीनंतर काँग्रेस पक्षाने मात्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेसने आरोप केला आहे की, अमेरिकेटे राष्ट्रपती जो बायडन यांच्यासोबत पत्रकार देखील भारतात आले आहेत. या पत्रकारांना पीएम मोदी आणि डो बायडन यांना प्रश्न विचारू इच्छीत होते. अमेरिकेचे सरकार प्रश्नांसाठी तयार होते, पण मोदी सरकारने या पत्रकारांना प्रश्न विचारण्याची परवानगी दिली नाही. काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट करत हे आरोप केले आहेत.
वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये १८० देशांच्या यादीत भारत १६१ व्या क्रमांकावर आहे. ही रँकिंग दर वर्षी खाली जात आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी देखील याबद्दल सोशल मीडिया साइट एक्सवर याबद्दल पोस्ट केली आहे. राष्ट्रपती बायडेन यांच्या टीमने सांगितले की अनेक प्रयत्नानंतर देखील भारतासोबतच्या द्विपक्षीय बैठकीनंतर मीडियाला त्यांच्या आणि पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारण्याची परवानगी नाकारण्यात आली. राष्ट्रपती बायडेन हे आता ११ सप्टेंबर रोडी व्हियतनाम येथे त्यांच्या सोबत आलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. याच आश्चर्य वाटावे असे काही नाही. याच पद्धतीने मोदी-स्टाइल लोकशाही तयार केली जाते.
दरम्यान भारत आणि दक्षिण आशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी२० शिकर सम्मेलनात सहभागी होण्यासाठी जगातील अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. सध्या भारताकडे जी२०ची अध्यक्षता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.