Dheeraj Sahu Tax Raid 
देश

Dheeraj Sahu Tax Raid: धीरज साहूंची 'कुबेर' सारखी संपत्ती मोजणे अद्यापही सुरुच; काँग्रेस म्हणत...

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर करण्यात आलेल्या छापेमारीत मोठे घबाड सापडले आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर आरोप करण्यास सुरुवात केलीय

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर करण्यात आलेल्या छापेमारीत मोठे घबाड सापडले आहे. त्यामुळे भाजपने काँग्रेसवर आरोप करण्यास सुरुवात केलीय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अडचणीत आल्याचं बोललं जातंय. असे असताना काँग्रेसने या प्रकरणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला आहे. (Congress distances itself from MP dheeraj sahu amid Rs 300 crore cash haul in tax raid)

काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव जयराम रमेश यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेस कोणत्याही प्रकारे संबंधीत नाही, असं रमेश म्हणाले आहेत. साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यात त्यांना ३०० कोटींपेक्षा जास्त रुपये सापडले आहेत. विशेष म्हणजे आणखी पैसे सापडण्याची शक्यता आहे.

साहू यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ही संपत्ती कोठून आली हे त्यांनाच विचारावं लागेल, असं जयराम रमेश म्हणाले. धीरज साहू यांच्याशी संबंधीत ओडिसा आणि झारखंड राज्यातील अनेक ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला. ६ डिसेंबर रोजी टाकण्यात आलेल्या या छाप्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेली संपत्ती ३०० कोटींच्या जवळ आहे. आतापर्यंत एका प्रकरणात सापडलेली ही सर्वाधिक रक्कम असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वाधिक संपत्ती ओडिसातील बोऊथ डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडमधून सापडली आहे.

पैशांची मोजणी अद्याप सुरु असून यासाठी मशिन्स कमी पडत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यासाठी अधिक मशिन्स मागवण्यात आल्या आहेत. सध्या ४० मशिन्स कार्यरत आहेत. तसेच रक्कम घेऊन जाण्यासाठी अधिकच्या गाड्या मागवण्यात येत आहे. माहितीनुसार, आणखी काही कपाटं उघडणं शिल्लक आहे.

साहू यांच्याकडे सापडलेल्या मोठ्या घबाडामुळे राजकीय वादळ निर्माण झालंय. भाजपने काँग्रेसला घेरलं आहे. काँग्रेस भ्रष्टाचारात कसा बरबटलाय हे पुन्हा स्पष्ट झालंय, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. जिथे काही घोटाळा होतो तेथे काँग्रेस नेत्याचं नाव पुढे येतं अशी टीकाही त्यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT