पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections) काँग्रेसने (Congress) पहिल्या 8 उमेदवारांच्या नावाची (Congress Candidate List) घोषणा गुरुवारी केली आहे. काँग्रेसच्या या यादीनंतर निवडणुकासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. लवकरच इतर उमेदवारांची यादी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. काँग्रेसने एकूण 40 जागांपैकी पहिल्या यादीत आपले 8 उमेदवार जाहीर केले आहेत.
मडगाव मतदार संघातून काँग्रेसचे नेते दिगंबर कामत (Congress Leader Digamber Kamat) निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तृणमूल काँग्रेसनेही या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी या निवडणुकीत (Election ) युती (Alliance) केली आहे. त्यामुळे गोवा विधानसभेची (Goa Assembly Election) निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. तर आम आदमी (AAP) पक्षानेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे
भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र या
भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee ) यांनी केले होते. मात्र काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे तृणमूल आणि काँग्रेसचे सूर जमण्याची शक्यता नसल्याने दिसू येत आहे. याचा फायदा नेमका कुणाला होणार हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.