Former Chief Minister Jagadish Shettar esakal
देश

'राज्यातील सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार, पण कधी ते सांगता येणार नाही'; असं का म्हणाले माजी मुख्यमंत्री?

काँग्रेसच्या आमदारांमुळेच राज्य सरकार पडणार आहे. मात्र, कधी ते सांगता येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

''सिद्धरामय्या यांचे हात बांधण्याचे काम सुरू आहे. सिद्धरामय्या यांना हाताशी धरल्याने राज्यात अस्थिर सरकार येईल. अशा स्थितीमुळे सरकारचेही नुकसान होणार आहे.''

बंगळूर : काँग्रेसचे आमदार सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस सरकार (Congress Government) कोणत्याही क्षणी कोसळेल, असे भाकीत माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांनी केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेसंदर्भात हुबळी येथे ते म्हणाले की, ''आमदार सरकारविरोधात नाराजी दर्शवत आहेत. म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सरकारमधील अंतर्गत संघर्ष वाढत चालला आहे. कधीही काहीही होऊ शकते.''

ते पुढे म्हणाले, सरकारही पडू शकते. काँग्रेसच्या आमदारांमुळेच राज्य सरकार पडणार आहे. मात्र, कधी ते सांगता येणार नाही. राज्य सरकार आपल्या चुका झाकण्यासाठी भाजपकडे (BJP) बोट दाखवत आहे. सरकारमधील घोटाळे झाकण्याचे काम सरकार करत आहे. वाल्मिकी निगम घोटाळ्यात फक्त नागेंद्र यांना पद सोडावे लागले. बाकी काहीही झाले नाही.

बनावट प्रकरणाचा तपास सुरू आहे; पण त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवू नका. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. उपमुख्यमंत्री बदलाबाबत केवळ मुख्यमंत्रीच संभ्रम निर्माण करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. सिद्धरामय्या यांचे हात बांधण्याचे काम सुरू आहे. सिद्धरामय्या यांना हाताशी धरल्याने राज्यात अस्थिर सरकार येईल. अशा स्थितीमुळे सरकारचेही नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT