Balamuri Venkat Narsingh Rao esakal
देश

गाढव चोरल्याप्रकरणी काँग्रेस नेत्याला अटक; सात जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सरकारी नोकऱ्या नसल्यामुळं काँग्रेस नेत्यानं मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनं केली होती.

काँग्रेस नेते (Congress) आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे (NSUI) अध्यक्ष बालमुरी व्यंकट नरसिंग राव (Balamuri Venkat Narsingh Rao) यांना तेलंगणातील (Telangana) करीमनगरमध्ये गाढव चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. पोलिसांनी बालमुरी यांना गुरुवारी रात्री हुजुराबाद शहरातून अटक केली. टीआरएस (TRS) नेत्यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले. विशेष बाब म्हणजे, काँग्रेस नेत्यावर तेच गाढव चोरल्याचा आरोप आहे, ज्याचा वापर बालमुरींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांच्या विरोधात आंदोलन करताना केला होता. दरम्यान, जम्मीकुंटा येथील रहिवासी असलेले तंगुतुरी राजकुमार यांनी गाढवाच्या चोरीचा आरोप करत सात जणांविरुद्ध तक्रार दाखल केलीय.

राज्यात सरकारी नोकऱ्या नसल्यामुळं बालमुरी यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनं केली होती. या आंदोलनादरम्यान त्यांनी चंद्रशेखर राव यांचा फोटो गाढवावर लावला होता. यानंतर टीआरएस नेत्यांनी यावर आक्षेप घेत पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर व्यंकट बालमुरी यांना गाढवाच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली. तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी (Rewant Reddy) म्हणाले, विद्यार्थी नेत्याला रात्री अटक करणं चुकीचं आहे. विद्यार्थी नेत्याला रोजगाराच्या विरोधात आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं त्यांनी नमूद केलं.

बालमुरी यांच्यावर विनापरवाना आंदोलन, दंगल, चोरी करणे आणि प्राण्यांवर क्रूरता दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 143, 153, 504, 379, 149, 67 आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 च्या कलम 11 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आलाय. एफआयआरनंतर बालमुरी यांनी सांगितलं की, त्यांनी गाढव भाड्यानं विकत घेतलं होतं. मात्र, पोलिसांचं म्हणणं आहे की, बालमुरींनी गाढव चोरलं आहे. तक्रारीत अन्य सहा जणांचीही नावंही आहेत, परंतु ते फरार आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: महाराष्ट्राचा निकाल लागताच कंगनानं उद्धव ठाकरेंना दैत्य संबोधलं! म्हटलं...

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: पहिला दिवस संपला! स्टार खेळाडूंनी भाव खाल्ला; अनेक खेळाडू झाले मालामाल

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

IND vs AUS 1st Test: ४ बाद, १७ धावा! टीम इंडियाचा दरारा; ऑस्ट्रेलियात मोडला ११३ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

SCROLL FOR NEXT