Congress leader jairam ramesh On Narendra Modi NDA Govrnment Marathi News  
देश

NDA Govt : ही तर नितीश व नायडू डिपेंडेबल आघाडी! काँग्रेसचे नेत्याचा ‘एनडीए’ सरकारला टोला

मोदी यांच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकार म्हणजे ‘नितीश व नायडू डिपेंडेबल आघाडी’ असल्याचा टोला काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी लगावला आहे.

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकार म्हणजे ‘नितीश व नायडू डिपेंडेबल आघाडी’ असल्याचा टोला काँग्रेसचे महासचिव खासदार जयराम रमेश यांनी लगावला आहे.

पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. परंतु यावेळी ते एक तृतीयांश पंतप्रधान असल्याचे सांगून जयराम रमेश म्हणाले, ‘‘यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व आंध्रप्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्या आधाराने हे सरकार असल्याने ते नितीश व नायडू यांच्या टेकूवर उभे आहे.’’
‘‘मोदी यांना या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्याशिवाय मोदी सरकार अस्तित्वात राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे,’’ असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांना भाजपने नेते म्हणून निवड केली नाही. तर ‘एनडीए’च्या बैठकीत त्यांची नेता म्हणून निवड करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

नेहरूंशी तुलना अयोग्य

जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत, अशी तुलना योग्य नसल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘पंडित नेहरू यांनी तिन्हीवेळा दोन-तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन केले होते. पंतप्रधान मोदी यांना दोनवेळा साध्या बहुमताने व आता तर त्रिशंकू लोकसभेचे नेतृत्व करावे लागत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांची तुलना पंडित नेहरूंशी करता येणार नाही.’’

मोदींचे सरकार घटनाबाह्य


पंतप्रधान मोदी यांचे सरकार हे घटनात्मक नसल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘शपथविधीला हजर राहण्याचे कोणतेही औचित्य नाही. केवळ पैशांचा वापर, प्रसारमाध्यमे, भीती दाखवून व धमक्या देऊन हे बहुमत मिळविले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT