Prithviraj Chavan vs Ajit Pawar esakal
देश

Prithviraj Chavan : 'असं काहीतरी घडतंय, याची पूर्ण कल्पना होती; आता गद्दारांनी राजीनामे देऊन..'

Maharashtra Politics : लोकांना गद्दारी अजिबात आवडत नाही. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे.

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

नरेंद्र मोदींना लोकसभेची निवडणूक जिंकायची आहे, हे वास्तव आहे, त्यामुळे दबावतंत्र सुरू आहे.

Karhad NCP News : ‘लोकांना गद्दारी अजिबात आवडत नाही. जे भाजपसोबत गेले आहेत, त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांना योग्य जागा कळेल,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषदेत केली.

मोदी व भाजपविरोधात (BJP) महाविकास आघाडी कायम राहणार आहे. जे सोबत आहेत, त्यांना सोबत घेऊन ताकदीने आम्ही भाजपविरोधात लढा देणार आहोत, असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या फुटीनंतर आमदार चव्हाण यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, शिवसेना फुटली, त्यातील पक्षांतरबंदीचा निकाल ऑगस्टमध्ये आहे. त्याचा निकाल सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. सरकार कोसळू नये, यासाठीची भाजपकडून ही पूर्वतयारी आहे. राष्ट्रवादीचा काही गट अनेक दिवसांपासून भाजपशी बोलणे करत होता. याबाबत असं काहीतरी घडतंय, याची पूर्ण कल्पना होती. ते आज घडलेलं आहे.

या नाट्याचा पहिला पार्ट अजित पवार यांच्या गटामुळे पुढे आला आहे. उद्या-परवा पुढचा भाग समजेल. राष्ट्रवादीचा मोठा गट अजित पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विभाजन करून भाजप व शिंदे गट यांच्या सरकारमध्ये सामील झाला आहे. त्यातील नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. हे का व कशामुळे घडले, ते महत्त्वाचे आहे.

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ७० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा नाव घेऊन उल्लेख करत त्यांच्यावर ठपका ठेवला. त्यासोबतच राज्य सहकारी बँकेचा घोटाळाही त्यांनी पुढे आणला. त्याची नावेही त्यांनी स्पष्ट केली. राज्यातील जनतेला या सगळ्याबद्दल चांगली माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी ज्यांच्यावर गंभीर आरोप केला, त्यांनाच भाजपच्या सोबत मंत्रिपदाची शपथ दिली आहे. हा राजकारणातला विरोधाभास आहे. चव्हाण म्हणाले, शिवसेनेतून फुटलेल्या १६ जणांवर जो खटला चालू आहे, त्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देण्यास नकार देत ते प्रकरण विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपविलेले आहे. आता त्यांना यावर निकाल घ्यायचा आहे. निकाल सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे.

त्यातून सरकार पडू नये म्हणून राष्ट्रवादी फोडण्यात आली. शिवसेना फुटली, त्यावेळी एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय आम्ही अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून घेतल्याचे जाहीर केले. आज त्याच अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाखाली शिवसेना काम करणार आहे. त्यामुळे आजच्या शपथविधीला त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते.

या सगळ्यामध्ये सरकारचे काय होईल, यापेक्षा नरेंद्र मोदींना लोकसभेची निवडणूक जिंकायची आहे, हे वास्तव आहे, त्यामुळे दबावतंत्र सुरू आहे. आगामी काळात चार राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे. उर्वरित ठिकाणी भाजपलाच लढा द्यायचा आहे. ही परिस्थिती पाहता महाराष्ट्र आपल्या बाजूला राहिला पाहिजे, यासाठी हा सगळा खेळ सुरू आहे.

राष्ट्रवादीतून फुटलेले ईडी गटाचे

राष्ट्रवादीतून फुटलेला जो गट आहे तो ईडी गट आहे, अशी टीका आमदार चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, फुटलेल्या प्रत्येकावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. घोटाळ्यांचे आरोप आहेत. आपल्याला चांगली झोप यावी, या उद्देशाने त्यांनी पक्षांतर केलेले आहे. गट फोडलेला आहे. भाजपनेही त्यांना मंत्रिपदे बहाल केली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT