राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी आज कॉंग्रेसला मोठा धक्का दिलाय.
Sidhu Call Old Friend to Prashant Kishor : राजकीय सल्लागार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी आज कॉंग्रेसला मोठा धक्का दिलाय. मागील अनेक दिवसांपासून प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता सर्व चर्चांना पूर्णविराम देत प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. याबाबतची अधिकृत माहिती कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलीय. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या या निर्णयानंतर पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांनी त्यांची भेट घेतली असून प्रशांत किशोर यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर करत कॅप्शनव्दारे हा आपला जुना मित्र असल्याचं म्हटलंय.
राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत नवज्योत सिंह सिध्दूनं ट्विटमध्ये लिहिलंय, माझा जुना मित्र पीकेसोबत एक छान भेट झाली. नुसती भेटच नाही तर जुनी वाईन, जुनं ते सोनं आणि जुने मित्र अजूनही सर्वोत्तम असल्याचं या भेटीनंतर त्यांनी नमूद केलंय. पण, सिध्दूच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरजार चर्चा सुरुय. सिध्दूनं आजच का प्रशांत किशोर यांची भेट घेतली? असे प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित होत आहेत.
प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं आहे की, "मी EAG म्हणून पक्षात सामील होण्याची आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची काँग्रेसची ऑफर नाकारली आहे. माझ्या मतानुसार कॉंग्रेस पक्षाला परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.