Jammu Kashmir Election Result 2024 
देश

Jammu Kashmir Election : ३७० हटवल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पराभव! ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री

Jammu Kashmir Election Result 2024 : ३७० कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र लढले होते

रोहित कणसे

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. ३७० कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र लढले होते. दरम्यान या निवडणुक्ती या दोन पक्षांच्या आघाडीने मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत विजयी आघाडी घेतल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली आहे.

केंद्रातील भाजप सरकारने ५ ऑगस्टला घेतलेला निर्णय जनतेला मान्य नाही हे निकालातून दिसले असल्याचा उल्लेख देखील फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. लोकांनी आपला जनादेश स्पष्ट दिला आहे असेही ते म्हणाले. दरम्यान मतमोजणीदरम्यान जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण ९० जागांपैकी २९ जागांवर भाजप तर ४७ जागांवर काँग्रेस आणि नॅशनल काँफ्रन्स यांच्या आघाडी मिळीली आहे. तर १३ जगांवर इतर आघाडीवर आहेत.

कोण किती जागांवर आघाडीवर?

भाजप २९

काँग्रेस ६

नॅशनल कॉन्फरन्स ४१

पीडीपी १

जेकेपीडीपी ४

इतर ८

फारूक अब्दुल्ला यांनी आपला मुलगा ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अशी घोषणा कली आहे. ओमर अब्दुल्ला य़ांनी बडगाम आणि गांदरबल या दोन जागांवरून उमेदवारी दाखल केली होतीय बडगाम येथून ते निवडणूक जिंकले आहेत तर गांदरबल जागेवर देखील ते आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्सने ८ जागांवर विजय मिळवला आहे तर त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसनेही एका जागेवर विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT