नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा प्रस्ताव नाकारल्यावर काही दिवसानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणजे पीके म्हणाले, काँग्रेस स्वतःच्या बळावर पुन्हा नव्याने उभे राहण्यास सक्षम आहे. त्यांना कोणत्याही पीकेची आवश्यकता नाही. कारण काँग्रेस पक्षाजवळ अनेक दिग्गज नेते आहेत. जे पक्षाला रुळावर आणू शकतात. प्रशांत किशोर म्हणाले, त्यांनी कधीही नेतृत्व बदलासाठी कोणताही प्रश्न आणि काही सुचवले नाही. वर्ष २०१४ नंतर पहिल्यांदाच अस घडतयं की काँग्रेस पक्ष (Congress Party) इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा करत आहे. आज तक वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाची भविष्यातील योजना संबंधी सहमती झाली आहे. (Congress Party Does Not Need Me, Says Prashant Kishor)
मात्र ते आपल्या बळावर करु शकतात. त्यांना माझी आवश्यकता नाही. मला जे काही सांगायचे होते, ते मी पक्षाला सांगितले. २०१४ नंतर पहिल्यांदाच पक्षाने आपल्या भविष्यावर अशा प्रकारे संरचनात्मक पातळीवर चर्चा केली आहे.
चर्चेची अफवा
या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेला अपयश आल्यानंतर पीके यांनी प्रियंका गांधी यांना पक्ष अध्यक्ष बनवण्यास पाठिंबा दिला होता. मात्र पीके ही अफवा असल्याचे सांगतात. याबाबत त्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.