Sonia Gandhi Sakal
देश

Congress Party : काँग्रेसने निवडणुकीसाठी कसली कंबर; आता भारत जोडो पूर्व ते पश्‍चिम

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘सीडब्ल्यूसी’ची बैठक पार पडली. तीन तास चाललेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरविण्यावर चर्चा झाली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्व-पश्चिम अशी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करावा, असा प्रस्ताव आज काँग्रेस कार्यसमितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत सर्व सदस्यांनी दिला. आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे ठरले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘सीडब्ल्यूसी’ची बैठक पार पडली. तीन तास चाललेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरविण्यावर चर्चा झाली. ज्या राज्यांमध्ये भाजपशी थेट सामना आहे. त्या राज्यांमध्ये उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याचे निर्देश देण्यात आहे. मुख्य प्रश्न काही राज्यांमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या घटकपक्षांशी जागावाटप करावयाचे आहे.

यात उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली व पंजाब या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासंबंधात निर्णय घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या समितीत माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल यांचा समावेश आहे. ही समिती थेट घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा जागा वाटपाचा निर्णय घेतील. आजच्या बैठकीत ‘सीडब्ल्यूसी’च्या बहुसंख्य सदस्यांनी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला.

यासंदर्भात मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुद्धा भाषणात उल्लेख केला. परंतु या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या स्वरूपात ही यात्रा काढण्यावर काहींनी प्रश्नचिन्ह उभे केले. कदाचित या यात्रेचे स्वरुप वेगळे राहू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha: ''शिवसेनावाल्यांची माफी मागतो.. त्याशिवाय विशाल पाटील खासदार होऊच शकले नसते'', बाळासाहेब थोरातांचा सांगलीत खुलासा

Share Market Today: शेअर बाजारात काय होणार? आजचे टॉप 10 शेअर्स कोणते? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

IND vs AUS : विराट कोहलीचा डिफेन्स, जसप्रीचा बाऊन्सर अन् टीम इंडियाचे ऑस्ट्रेलियाला चॅलेंज, Video

Latest Maharashtra News Updates : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

'महाराष्‍ट्र लुटून गुजरातचा विकास करणाऱ्या बाप-लेकांना सिंधुदुर्गात थारा देऊ नका'; उद्धव ठाकरेंचा राणे घराण्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT