Priyanka- rahul Gandhi eSakal
देश

Wayanad Constituency: दक्षिण ते उत्तर सर्व 'काँग्रेसमय' होणार? प्रियांका गांधींना वायनाडमधून उतरवण्याचं कारण समजून घ्या...

Priyanka Gandhi contesting from Wayanad : राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणुका लढवल्या होत्या.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे अखेर राजकीय लाँचिंग झाले आहे. प्रियांका गांधी यांनी केरळमधील वायनाड येथून लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणुका लढवल्या होत्या. ते या दोन्ही ठिकाणांहून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांना एक मतदारसंघ सोडावा लागणार होता.

सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण रायबरेली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. याचवेळी काँग्रेसकडून एक मोठी घोषणा करण्यात आली. प्रियांका गांधी या वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार असं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे रायबरेली आणि वायनाडमध्ये गांधीच प्रतिनिधित्व करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राहुल आणि प्रियांका दोन्ही भाऊ-बहीण आता पूर्णपणे राजकारणात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या असल्याने पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. त्यात प्रियांका गांधी यांच्या लोकसभेच्या मैदानात उतरण्याने कार्यकर्त्यांना हुरूप येणार आहे. वायनाडमधून प्रियांका जिंकल्या तर उत्तर आणि दक्षिणमधून काँग्रेसला भक्कम जनाधार मिळण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. राहुल गांधी आता रायबरेलीचे खासदार आहेत. प्रियांका गांधी यांनी वायनाडचे मैदान मारल्यास पक्षाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब ठरणार आहे. उत्तर, दक्षिण आणि पश्चिममधून गांधी घराण्याचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये जाणार आहे. राजकीयदृष्ट्या ही गोष्ट काँग्रेससाठी फायद्याची ठरू शकते.

प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा होताच त्यांचे केरळमध्ये स्वागत देखील सुरू झाले आहे. वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. राहुल गांधी याठिकाणी दोन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यामुळे गांधी घराण्याच्या आणखी एका सदस्याला वायनाडचे नागरिक स्वीकारण्याची शक्यता जास्त आहे.

यूपीमध्ये गांधी असणे महत्त्वाचे!

गेल्या १५ वर्षामध्ये काँग्रेसची यूपीमधील कामगिरी चांगली राहिलेली नाही. यूपी हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे राज्यात आपला पक्ष मजबूत करणे काँग्रेससाठी गरजेचं बनलेलं आहे. यावेळी काँग्रेसनेने यूपीमध्ये गेल्या १५ वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. वोट शेअर देखील वाढला आहे. त्यामुळे राज्यात आणखी प्रभाव निर्माण करायचा असेल तर गांधी कुटुंबाला याठिकाणी आपले पाय रोवून काम करावे लागणार आहे

यूपीमध्ये २०२७ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. काँग्रेसला २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत फक्त २ जागा जिंकता आल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून आला होता. राज्यजसभेवर एकही खासदार नाही. सर्वात मोठ्या राज्यात काँग्रेसची स्थिती दयनीय आहे. २०२४ च्या लोकसभेमध्ये काँग्रेसला सहा जागा जिंकता आल्या आहेत. समाजवादी पक्षासोबत मिळून चांगल्या कामगिरीची अपेक्षा काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये राहून किल्ला लढवण्याचं ठरवलं आहे.

१५ वर्षानंतर यूपीमध्ये काँग्रेसची स्थिती बदलत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राहुल गांधी सर्वात मोठ्या राज्यातील लोकसभा जागा सोडून स्वत:च्या पायावर दगड मारून घेणार नाहीत. मात्र, दक्षिणकडे देखील योग्य संदेश जाणे आवश्यक होते. त्यामुळेच वायनाडमध्ये गांधी घराण्याच्या सदस्याला उतरवण्यात आले आहे. राहुल गांधी उत्तर भारत सांभाळतील, अन् प्रियांका गांधी दक्षिण भारत, अशी रणनीती काँग्रेसची असू शकते. दक्षिण आणि उत्तर भारताला काँग्रेस सोबत घेऊ पाहात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT