Congress President Election 2022 esakal
देश

ठरलं! शशी थरूर अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, प्रतिनिधीनं घेतला उमेदवारी अर्ज

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र झाली आहे.

Congress President Election 2022 : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र झाली आहे. या पदासाठीचे उमेदवार आणि उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालीय. काँग्रेस अध्यक्षपदासाठीचे दावेदार 30 सप्टेंबरपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहेत.

दरम्यान, अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी शनिवारी आपला प्रतिनिधी पाठवून उमेदवारी अर्ज मागवला. या कालावधीत त्यांनी नामनिर्देशनपत्राच्या 5 संचांची मागणीही केली. त्यानंतर थरूरांच्या प्रतिनिधीला पाच संच देण्यात आले आहेत. अलीम असं त्यांच्या प्रतिनिधीचं नाव असून ते थरूर यांचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचले होते.

अलीम हे ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. थरूर यांनी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाला कळवलं होतं की, आज सकाळी त्यांचं अधिकृत पत्र घेऊन आलेल्या व्यक्तीला उमेदवारी अर्ज देण्यात यावा. काँग्रेस नेते मधुसूदन दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात उमेदवारी अर्ज वाटपासाठी सज्ज झाले आहेत.

उमेदवार प्रतिनिधी पाठवून अर्ज मागवू शकतात

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कोणताही उमेदवार वैयक्तिकरित्या येऊ शकतो किंवा आपला अधिकृत प्रतिनिधी पाठवून उमेदवारी अर्ज मागवू शकतो. कोणताही उमेदवार त्याच्या प्रतिनिधीमार्फत नामनिर्देशनपत्र मागवू शकतो. पण, अर्ज जमा करण्यासाठी स्वतः उमेदवारालाच कार्यालयात यावं लागणार आहे.

19 ऑक्टोबरला होणार मतमोजणी

काँग्रेसनं गुरुवारी पक्षाध्यक्षपदासाठी अधिसूचना जारी केली होती. पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 1 ऑक्टोबर रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तर, 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी आणि निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT