Rahul Gandhi NEET exam esakal
देश

Rahul Gandhi : NEET परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये...

या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. कोर्टाने म्हटलं की, नीट-युजी २०२४ परीक्षेच्या नियोजनात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला असेल तर या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे.

संतोष कानडे

Rahul Gandhi on NEET Exam : नीट परीक्षेत झालेल्या हेराफेरीवरुन काँग्रेसकडून सातत्याने भाजपवर हल्ला होत आहे. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेला असतानाही देशाचे पंतप्रधान मौन बाळगून आहेत. जिथे जिथे भाजपशासित राज्यं आहेत तिथे पेपरफुटीचं केंद्र बनत आहे.

राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं की, नीट परीक्षेमध्ये २४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. तरीही नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन बाळगून आहेत. बिहार, गुजरात, आणि हरियाणा या राज्यांमध्ये झालेल्या कारवायांवरुन हे स्पष्ट होतंय की, परीक्षांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने संघटीत भ्रष्टाचार होत आहे आणि भाजपशासित राज्यं पेपरफुटीचे केंद्र बनले आहेत.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आमच्या न्यायपत्रामध्ये पेपर लीक प्रकाराविरुद्ध कडक कायदा बनवून युवकांचं भविष्य सुरक्षित करण्याची गॅरंटी आम्ही दिली होती. विरोधी पक्षाची जाबाबदारी निभावून आम्ही देशभरातील युवकांचा आवाज बुलंद करणार आहोत.

या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. कोर्टाने म्हटलं की, नीट-युजी २०२४ परीक्षेच्या नियोजनात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला असेल तर या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT