नवी दिल्ली : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या सुपुत्राच्या विवाह समारंभाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी किंवा गांधी कुटुंबातील इतर सदस्य सामील होण्याची शक्यता नाही.
मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा विवाह राधिका मर्चंट यांच्याशी होत आहे. या विवाहानिमित्त येत्या १४ जुलैला मुंबईत स्वागत समारंभ आयोजित केला आहे. यासाठी काही प्रमुख पाहुण्यांना मुकेश अंबानी यांनी स्वतः जाऊन निमंत्रणे दिली आहेत.
काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांची मुकेश अंबानी यांनी गेल्या ४ जुलैला दिल्लीत भेट घेऊन विवाह समारंभाला येण्याचे निमंत्रण दिले आहे. येत्या १४ जुलैला होणाऱ्या समारंभासाठी देश विदेशातील प्रमुख पाहुणे तसेच बॉलीवुडमधील अभिनेते हजेरी लावणार आहेत.
परंतु सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही या समारंभाला हजेरी लावणार नसल्याचे समजते. राहुल गांधी यांनी सातत्याने अदानी व अंबानी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. या पार्श्वभूमीवर गांधी कुटुंबातील कुणी व्यक्ती या समारंभाला हजेरी लावणार काय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
याच काळात महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीत राहुल गांधी सामील होणार असल्याचे समजते. परंतु याबाबत अद्यापही काँग्रेसने अधिकृत कार्यक्रम जाहीर केलेला नाही. राहुल गांधी १३ किंवा १४ जुलैला वारीत सामील होऊन काही किलोमीटर वारकर्यांसोबत चालतील, असे बोलले जात आहे.
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल कुणीही अपशब्द वापरू नये, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. स्मृती इराणी यांचा लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर समाज माध्यमांवर त्या ट्रोल होत आहे. याबद्दल आज राहुल गांधी यांनी एक्स या सोशल माध्यमावर 'हार जीत हा जीवनाचा एक भाग आहे. स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्याबद्दल अपशब्दांचा वापर करू नये. कुणाचा अपमान करणे ही दुर्बलतेची खूण आहे शक्तीची नाही', असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.