नवी दिल्ली : वृत्त वाहिन्या व मुख्य प्रवाहातील माध्यमे कांग्रेस नेते राहुल गांधी यांना फारशी प्रसिद्ध देत नसले तरी त्यांचे यूट्यूब चॅनेल हे राजकीय पक्ष व नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा अहवाल आता प्रसिद्ध झाला आहे. (Rahul Gandhi YouTube Channel)
या रिपोर्टमध्ये गेल्या ६ एप्रिल ते १२ एप्रिलला संपलेल्या आठवड्यातील राजकीय पक्ष व नेत्यांच्या यूट्यूब चॅनेलला मिळालेल्या दर्शकांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही आकडेवारी १८ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आली. राजकीय पक्ष व राजकीय नेते गटातील एकूण दर्शकांपैकी तब्बल ३१ टक्के दर्शक हे राहुल गांधी यांचे यूट्यूब चॅनेल पाहत असल्याचे दिसून आले आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेले नरेंद्र मोदी यांचेही यूट्यूब चॅनेल आहे. त्यांचे सबस्क्राईबर सुद्धा राहुल गांधी यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत. परंतु त्यांचे यूट्यूब चॅनेल एकूण दर्शकांपैकी केवळ ९ टक्के दर्शक पाहतात.
यूट्यूब चॅनेलच्या पहिला दहा दर्शकांमध्ये इंडीया आघाडीतील काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या यूट्यूब चॅनेलने बाजी मारली आहे. ६ एप्रिल ते १२ एप्रिल या काळात पहिल्या क्रमांकावरील राहुल गांधी यांचे यूट्यूब चॅनेल ५ कोटी ८० लाख दर्शकांनी पाहिलेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पार्टीचे यूट्यूब चॅनेल आहेत.
या चॅनेलला २ कोटी ८० दर्शकांची पसंती लाभली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेस पक्षाचे अधिकृत यूट्यूब चॅनेल इंडीयन नॅशनल काँग्रेस हे २ कोटी ६० लाख लोकांनी पाहिले तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला या आठवड्यात १ कोटी ५० लाख दर्शक लाभले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलच्या सबस्क्राईबरची संख्या २ कोटी २० लाख एवढी प्रचंड आहे. तर राहुल गांधी यांच्या यूट्यूबच्या सबस्क्राईबरची संख्या ४५ लाख एवढीच आहे.
भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलला १ कोटी ३० लाख दर्शक लाभले आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसची स्थिती चांगली नाही परंतु उत्तरप्रदेश काँग्रेस या यूट्यूब चॅनेला या आठवड्यात ८० लाख ६० हजार दर्शक पटकावून सहावा क्रमांक पटकाविला आहे.
या गटातील पहिल्या १० जणांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव नेते नितीन गडकरी यांच्या यूट्यूब चॅनेलला पसंती मिळाली आहे. या आठवड्यात नितीन गडकरी यांच्या यूट्यूब चॅनेलला ४० लाख ५० हजार दर्शक लाभले. तामीळनाडूतील भाजपचे नेते अन्नामलाई थमराई यांच्या यूट्यूब चॅनेलने दर्शकांच्या बाबतीत दहावा क्रमांक पटकाविला असून त्यांना या आठवड्यात २० लाख ६० हजार दर्शक लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.