नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या मतदारांना कसे सामोरे जातात हे त्यांच्यावरच अवलंबून असल्याचे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी यांची प्रतिमा उच्च असून त्या राज्यात पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या ‘कॅप्टन’ आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला कॉंग्रेसचे मोठे आव्हान राहणार असून निवडणुकीत संपूर्ण शक्तीनिशी लढण्याबाबत प्रियांका गांधी कटिबद्ध आहेत, असेही खुर्शिद म्हणाले.
‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सलमान खुर्शिद म्हणाले, की निवडणुकीत कॉंग्रेस हा आघाडीसाठी कोणाचीही वाट पाहणार नाही आणि आहे त्या मंडळीसोबत आम्ही लढण्यास तयार आहोत. प्रियांका गांधी या मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात योग्य उमेदवार आहेत काय? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जोपर्यंत याबाबत संकेत मिळत नाही, तोपर्यंत आपण या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. परंतु त्या या पदासाठी सर्वोत्तम उमेदवार आहेत. उत्तर प्रदेश जाहीरनामा समितीचे प्रमुख खुर्शिद म्हणाले की, तुम्हाला एवढेच काम करायचे आहे, की मुख्यमंत्री योगी आणि प्रियांका गांधी यांचा फोटो आपल्यासमोर ठेवा. आपल्याला आणखी काही प्रश्न विचारायची गरज नाही. त्या उत्तर प्रदेशातील मतदारांना कसे सामोरे जातात, हा त्यांचा निर्णय असेल. याबाबत त्या निर्णय घेतील आणि त्याची माहिती लवकरच देतील, अशी आशा आहे. त्या आमच्या कॅप्टन आहेत, असे सलमान खुर्शिद म्हणाले. निवडणुकीत आम्ही तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. आमच्याकडे असलेल्या सामर्थ्याच्या बळावर शक्तीनिशी लढण्याचा निर्धार केल्याचे ते म्हणाले.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. ४०३ जागांच्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला ४७ जागा मिळाल्या. भाजपने ३१२ जागा जिंकून दणदणीत यश मिळवले होते. बहुजन समाज पक्षाला १९ जागा जिंकता आल्या. त्यामुळे कॉंग्रेसला निवडणुकीत मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मागील आठवड्यात एका मुलाखतीत म्हटले की, आपला पक्ष मोठ्या पक्षांशी आघाडी करणार नाही, पण लहान पक्षांसमवेत एकत्रपणे निवडणूक लढवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.