'काँग्रेसला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, हा सल्ला तुमच्याकडंच ठेवा.'
'2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष (Congress Party) फक्त 'त्या' 200 जागांवर निवडणूक लढवेल, जिथं त्यांची भारतीय जनता पक्षाशी थेट लढत असेल. शिवाय, मजबूत प्रादेशिक पक्षांना इतर जागांवर लढण्याची परवानगी मिळेल.' बिहारचे (Bihar) माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या या सल्ल्यानं काँग्रेस पक्षात संतापाची लाट उसळलीय.
काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाचे राष्ट्रीय संयोजक सरल पटेल यांनी तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी म्हटलंय, काँग्रेसला तुमच्या सल्ल्याची गरज नाही, हा सल्ला तुमच्याकडंच ठेवा. पक्षानं काय करावं, याचा विचार करण्यासाठी काँग्रेसचे लोक पुरेसे आहेत, असा टोला पटेल यांनी तेजस्वी यादव यांनी लगावलाय. पटेल यांच्या ट्विटला उत्तर देताना आरजेडीचे सोशल मीडिया समन्वयक आकाश म्हणाले, निवडणुकीत काँग्रेस नोटाविरोधात लढत असल्यानं काय करावं याचा विचार करण्यास पक्ष सक्षम आहे. मात्र, त्यांचा हा अहंकार त्यांना निवडणुकीत पराभूत करेल, असं त्यांनी नमूद केलंय.
आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपशी लढण्यासाठी विरोधी एकजुटीवर भर देत तेजस्वी यादव यांनी सुचवलं की, काँग्रेस पक्षानं केवळ 200 जागांवर उमेदवार उभे करावेत आणि त्यातील किमान 50 टक्के जिंकावेत. ज्या जागांवर भाजपशी थेट लढत आहे, अशा जागांवर काँग्रेसनं लढावं आणि भगव्या पक्षाचा पराभव करावा. तसंच इतर जागांवर बलाढ्य प्रादेशिक पक्षांना संधी द्यावी, असं त्यांनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.