Lok Sabha Election  
देश

Congress : लोकसभा-विधानसभेत काँग्रेसकडून तुफान खर्च! निवडणुकीत खर्च केले शेकडो कोटी; आकडा वाचून डोळे गरगरतील

Congress 2024 election expenses : लोकसभा निवडणुकीत तुलनेने चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दाबून खर्च केला आहे.

रोहित कणसे

लोकसभा निवडणुकीत तुलनेने चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दाबून खर्च केला आहे. या खर्चाचा तपशील आता समोर आला असून निवडणुक आयोगाच्या रिपोर्टनुसार, लोकसभा आणि त्यासोबत चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५८५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

यावेळी लोकसभा निवडणुकीसोबत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किममध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. काँग्रेसने मीडिया कॅम्पेन आणि प्रचारात ४१० कोटी रुपये खर्च केले आहेत. या सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रचारावर ४६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

काँग्रेसने आधी दावा केला होता की त्यांच्याकडे पैश्यांची कमतरता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून सांगण्यात येत होते की भाजप सरकारने त्यांची बँक खाती गोठवली आहेत. ओडिशामध्येतर एका काँग्रेस उमेदवाराने चक्क निवडणुकीचे तिकीट परत केले होते. त्यांचे म्हणणे होते की, पक्षाकडून उमेदवारांना मदत केली जात नाहीये आणि फंड कमी पडत असल्याने त्या तिकीट परत करत आहेत. पुरी येथील काँग्रेसच्या उमेदवार सुचारिता मोहंती यांनी त्यांचे तिकीट परत केले होते. त्यांनी सांगितलं होतं की, पक्षाकडून त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले गेले होते की सर्व उमेदवारांनी आपला खर्च स्वतःच करायचा आहे.

दरम्यान काँग्रेस पक्षाने सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या स्टार प्रचारकांनी विमान प्रवासावर तब्बल १०५ कोटी रुपये खर्च केले. निवडणुकीत राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्डुन खरगे यांच्यासह अनेक दिग्गजज प्रचार करत होते. काँग्रेसने राहुल गांधींसह अनेक नेत्यांना निवडणूक लढण्यासाठी पैसे दिले होते. काँग्रेस पक्षाने उमेदवारांना ११.२० कोटी रुपये दिले होते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने घोषणा केली होती की, त्यांच्याकडे फक्च १७० कोटी रुपये जमा आहेत. दरम्यान गेल्या वर्षी आयकर विभागाने काँग्रेसची काही बँक खाती गोठवली होती. पण हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आयकर विभागाने खात्यांवरील कारवाई मागे घेतली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५४३ पैकी ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपने तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन केले. विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसची कामगिरी विशेष राहिलेली नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT