Bharat Jodo Nyay Yatra Esakal
देश

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा लवकर संपवणार; काय घडलंय नेमकं?

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. पण या यात्रेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियोजित वेळापत्रकापेक्षा ही यात्रा लवकर संपवण्यात येणार असल्याचा विचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याचं कारणही समोर आलं आहे. (Congress to end Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra earlier than planned skip most of west UP)

राहुल गांधींची ही यात्रा या आठवड्यात उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार होती आणि 80 लोकसभा जागा असलेल्या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण राज्यात 11 दिवस घालवणार होती. जिथं गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला छाप पाडण्यात अपयश आलं आहे.

यूपीमध्ये, ही यात्रा 28 लोकसभा मतदारसंघांमधून जाणार होती, त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा वाराणसी, रायबरेली, अमेठी, अलाहाबाद, फुलपूर आणि लखनौ. मूळ मार्गामध्ये चंदौली, वाराणसी, जौनपूर, अलाहाबाद, भदोही, प्रतापगढ, अमेठी, रायबरेली, लखनौ, हरदोई, सीतापूर, बरेली, मुरादाबाद, रामपूर, संबल, अमरोहा, अलिगढ, बदाऊन, बुलंदशहर आणि आग्रा या भागांचा समावेश होता.

पश्चिम युपीतून जाणार नाही

पण आता भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम युपीच्या जिल्ह्यांमध्ये जाणार नसल्याचं कळतं आहे. ती थेट लखनऊवरुन अलिगड आणि नंतर आग्रा अशी जाणार आहे. मध्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी ही दोन्ही ठिकाणं पश्चिम उत्तर प्रदेशात येतात. पण मजेशीर बाब म्हणजे या भागात इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाची ताकद आहे. सध्या आरएलडीकडून भाजपशी एनडीएत समाविष्ट होण्याबाबत चर्चा सुरु आहेत.

काँग्रेसचं स्पष्टीकरण

दरम्यान, काँग्रेसच्या सुत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात यात्रेमध्ये बदलण्याचा आणि आरएलडीबाबत घडत असलेल्या घडामोडींचा संबंध नाही. तर राहुल गांधींनी यात्रेदरम्यान लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधता यावा यासाठी आम्ही त्याचा वेग कमी करण्याचा विचार करत आहोत.

त्यानुसार, 20 मार्चपर्यंत मुंबईत संपणार असलेली यात्रा आता 10 ते 14 मार्च दरम्यान नियोजित वेळेपेक्षा किमान एक आठवडा आधी संपेल कारण गांधींना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक वेळ मिळेल. सूत्रांनी सांगितले की, प्रियंका गांधी या आत्तापर्यंत या यात्रेत सहभागी झालेल्या नाहीत. पण यात्रा उत्तर प्रदेशात प्रवेश केल्यावर त्या हजेरी लावू शकतात.

मुंबईत इंडिया आघाडीचे सदस्य एकाच मंचावर येणार

इंडिया आघाडीनं या महिन्याच्या अखेरीस कर्नाटकमध्ये पहिली संयुक्त रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड), तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळं आघाडीत सध्या गोंधळाचं वातावरण आहे.

तसंच आता आरएलडी देखील इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपावेळी काँग्रेस आपल्या सर्व इंडिया आघाडीच्या सदस्यांना रॅलीसाठी आमंत्रित करण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT