देशात भाजपविरुध्द 20 पक्षांची मोट बांधणी केली आहे. यात राष्ट्रवादी आहे. याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. मात्र, येथे त्यांनी भूमिका वेगळी घेतली आहे.
बेळगाव : राज्यातील 40 टक्के कमिशन उघडकीस आल्याने भारतीय जनता पक्षाची पोलखोल झाली आहे. केंद्र व राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून, कॉंग्रेसला (Congress) 130 जागा मिळतील, असा विश्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज कॉंग्रेस भवनमधील पत्रकार परिषदेत केला.
श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘केंद्रात आणि राज्यात भाजपची (BJP) सत्ता आहे. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळेल, असे वाटत होते. मात्र, डबल भ्रष्टाचार सुरु आहे. अदानी कंपनीत 20 हजार कोटी रुपयांची बेनामी गुंतवणूक, निकटर्वती उद्योजकांसाठी पोषक निर्णय घेण्यात आल्याबाबतचा विषय राहुल गांधी यांनी उपस्थित केल्यामुळे मानहानी दावा दाखल करून खटल्यात गुंतविले. याची कल्पना मतदारांना आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस पक्षाची एकहाती येईल, 130 पेक्षा अधिक जागा पक्षाला मिळतील.’’
कर्नाटक देशातील महत्वाचे राज्य. विकासात बेंगळूरचे योगदान आहे. परंतु, 40 टक्के कमिशनची पोलखोल झाल्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. ठेकेदाराकडे लाच मागितल्याची तक्रार पंतप्रधानांकडे केली आहे. दुदैवाने कारवाई झाली नाही. मंत्री ईश्वरप्पा यांची उचलबांगडी झाली, चौकशीचे नाटक करत क्लीन चिट देण्यात आली. दडपशाही, हुकूमशाही वाढल्याचे जाणविते. यामुले जनतेने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. या वेळी काँग्रेस निरीक्षक नवाजुद्दीन, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, सलीम खतीब आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून 40 उमेदवार आखाड्यात उतरविले आहे. देशात भाजपविरुध्द 20 पक्षांची मोट बांधणी केली आहे. यात राष्ट्रवादी आहे. याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे. मात्र, येथे त्यांनी भूमिका वेगळी घेतली आहे. स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. निपाणी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारांमुळे तिरंगी लढत आहे. मतांची विभागणी होऊन भाजप उमेदवारांना फायदा होण्याची भीती आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.