देश

Vinesh Fogat Congress: विनेश फोगाटला कॉंग्रेस निवडणुकीत उतरवणार? भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न

Haryana Vidhansabha Election: या पोटनिवडणुकीत बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपचा विजय निश्चित आहे.

Chinmay Jagtap

Latest Political Update: पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत अपात्र ठरल्याने पदकापासून दूर राहिलेली कुस्तीपटू विनेश फोगाटवर झालेल्या अन्यायाचा हरयाणाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सुरु केला आहे.

ऑलिम्पिक पदक हुकल्यानंतर कुस्तीतून विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली आहे. विनेशला आम्ही हरयाणातून राज्यसभेवर निवडून आणले असते. पण काँग्रेसपाशी बहुमत नाही, असे विधान करीत हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी विनेशबद्दलची काँग्रेसची सहानुभूती जाहीर केली.

हुड्डा यांचे पुत्र दीपिंदरसिंह हुड्डा लोकसभेवर निवडून आल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पुढच्या महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे. पण या पोटनिवडणुकीत बहुमत असलेल्या सत्ताधारी भाजपचा विजय निश्चित आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदके जिंकून देणारे हरयाणाचे खेळाडू असतात. पण केंद्रातील मोदी सरकार त्यांच्यावर अन्याय करुन खेळांसाठी आर्थिक तरतूद करताना गुजरातला झुकते माप देत हरयाणाशी भेदभाव करते, असा आरोप काँग्रेसनेते करीत आहेत.

केंद्र सरकारच्या तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या सत्ता तंत्राच्या विरोधावर मात करुन ऑलिम्पिक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशविरुद्ध कुत्सित कारस्थान रचले गेले.

देशाच्या या सर्वात शौर्यवान मुलीला पदकापासून वंचित ठेवण्यासाठी रचलेल्या कारस्थानाचे उत्तर जनताच देईल, असे हरयाणाचे नेते व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, खा. रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांच्या शारीरिक व मानसिक जुलमांविरुद्ध दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या आणि नव्या संसद भवनाच्या उद् घाटनप्रसंगी दिल्ली पोलिसांनी फरफटत नेलेल्या विनेश फोगाटविरुद्ध मोदी सरकारने गुन्हा दाखल करुन खटला भरला.

अन्यायाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विनेश आणि अन्य कुस्तीपटूंचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी सदैव समर्थन केले, याची जाणीव सुरजेवाला यांनी करुन दिली.

युक्रेन-रशिया युद्ध थांबविणाऱ्या पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करुन विनेशला न्याय का मिळवून दिला नाही0 विनेश अंतिम फेरीत दाखल होत असताना पंतप्रधान मोदी, त्यांचे सहकारी मंत्री तसेच भाजपनेते तिचे अभिनंदन करण्यास कचरत का होते0 असे प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसने विनेश फोगाटवरुन भाजपला बॅकफूटवर ढकलले आहे.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगाटच्या भावनिक मुद्याचे भांडवल करण्यासाठी निवृत्त झालेल्या विनेश फोगाटला काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT