नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण केलंय. मोदींनी काँग्रेसवर टीका करत म्हटलंय की, या देशाचं दुर्भाग्य असाय की, अनेक जण असे आहेत की ज्यांचा काटा 2014 तच अडकला असून त्यातून ते बाहेरच पडू शकत नाहीये. ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला आहे. त्यांना देशाच्या जनतेनं पुरतं ओळखलं आहे. पन्नास वर्षापर्यंत तुम्हीही इथे बसण्याची संधी मिळाली होती. (PM Modi in Lok Sabha)
त्यांनी काँग्रेसच्या पराभवाचा पाढा वाचून दाखवला आहे. कोणकोणत्या राज्यांमध्ये काँग्रेसला गेल्या कित्येक वर्षांपासून नाकारलं जात आहे, त्यांची यादीच मोदींनी वाचून दाखवली आहे. अंध विरोध हा लोकशाहीचा पराभव आहे असं म्हणत ते म्हणाले की, नागालँडच्या लोकांनी 1999 साठी 24 वर्षांपूर्वी काँग्रेसला मत दिलं होतं. ओडीसाने 1995 साली दिलं होतं, गोव्याने 1994 साली पूर्ण बहुमत दिलं होतं. त्यानंतर शेवटचं 1988 मध्ये त्रिपुरामध्ये मत मिळालं होतं. पश्चिम बंगालमध्ये 1972 मध्ये पूर्ण बहुमत मिळालं होतं. तमिळनाडूने 1962 मध्ये दिलं होतं तर तेलंगणा बनवूनही नंतरही जनतेने काँग्रेसनं स्विकारलं नाही. झारखंडचा जन्म होऊन 20 वर्ष होऊनही काँग्रेसला जनतेने स्विकारलं नाही. असं त्यांनी म्हटलं. (PM Modi Criticized Congress)
ही टीका करताना काँग्रेस आणि विरोधकांनी गोंधळ घालताना मोदींनी विरोधकांना झापलंही. त्यांनी म्हटलं की, एवढा पराजय होऊन ना तुमचा अंहकार जातोय... ना तुमचं हे वागणं जातंय. यांना कदाचित शंभर वर्षे घरीच बसायचं आहे वाटतं. म्हणूनच उत्तर देणं आम्हाला भाग पडतं आहे. मुद्दा निवडणुकीच्या निकालाच नसून त्यांच्या नितीमत्तेचा आहे. एवढ्या मोठ्या लोकशाही इतका काळ सत्ता भोगूनही देशाची जनता कायमसाठी का नाकारत आहे, याचा विचार करावा, असा उपदेशही त्यांनी दिला. (Narendra Modi)
ते म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जगात नवा बदल घडून आला, ज्यामध्ये आपण जगतो आहोत. कोरोना काळानंतर जग एक नव्या वर्ल्ड ऑर्डर वा व्यवस्थेकडे गतीने चालला आहे. एक असा टर्निंग पॉईंट की आपण भारत म्हणून या निमित्ताला गमावू इच्छित नाहीये. भारताने एक लीडरशीप रोलसाठी स्वताला कमी समजलं नाही पाहिजे. या परिप्रेक्ष्यामध्ये स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी एक प्रेरणादायी औचित्य आहे. नव्या संकल्पाने देश स्वातंत्र्याची शंभरीही साजरी केली. पूर्ण संकल्पाने आपण देशाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ.
आपल्या सरकारचं कौतुक करत ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशाने अनेक क्षेत्रामध्ये मुलभूत व्यवस्थेमध्ये अत्यंत मजबूतीसोबत पुढे गेलो आहे. पंतप्रधान आवास योजनेला जी गती आणि व्यापकता आपण दिली त्यामुळे आज गरीबांचं देखील लाखोंहून अधिक किंमतीचं घर बनत आहे. तो गरीब आज लखपतीच्या श्रेणीमध्ये येत आहे. पायाभूत सुविधेत देशानं भरपूर प्रगती केली आहे.
पुढे ते म्हणाले की, हा गरीबांचा आनंद पाहून देशालाही ताकद मिळते. गरीबाच्या घरी गॅस कनेक्शनचा आनंद काही वेगळाच असतो. गरीबांचं बँकेतलं खातं असो, सरकारद्वारे दिली गेलेली रक्कम थेट त्याच्या खात्यात जाते. हे सगळं तुम्ही जनतेमध्ये असता तर हे सगळं तुम्हाला जरुर दिसतं.
लता मंगेशकरांना आदरांजली
मोदींनी लता मंगेशकरांना सुरुवातीलाच श्रद्धांजली वाहिली. म्हणाले की, मी माझं मत मांडण्यापूर्वी कालच्या घटनेबाबत दोन शब्द बोलू इच्छितो. देशाने लतात दीदींना गमावलं. किती काळापासून ज्यांच्या आवाजाने देशाला मोहित आणि प्रेरित केलं. संस्कृतीला, देशाला मजबूत केलं. 36 भाषांमध्ये गाणं गायलं. हे प्रेरणादायी उदाहरण असून त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.