Karnataka Politics DK Shivakumar vs HD Kumaraswamy esakal
देश

Rajyasabha Election : काँग्रेसला तीन, भाजपला एक जागा; उमेदवाराच्या पराभवामुळं धजद तोंडघशी, दोन आमदारांचा भाजपला धक्का

राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

२२३ आमदारांपैकी २२२ आमदारांनी मतदान केले, तर भाजपचे आमदार शिवराम हेब्बार यांनी मतदान केले नाही.

बंगळूर : राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी काँग्रेसचे तीन आणि भाजपच्या एक विजयी झाला असून, धजद उमेदवार पराभूत झाला आहे. राज्यसभा निवडणूक अधिकारी आणि विधानसभा सचिव एम. के. विशालाक्षी सायंकाळी निकाल जाहीर केला. काल सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले.

२२३ आमदारांपैकी २२२ आमदारांनी मतदान केले, तर भाजपचे आमदार शिवराम हेब्बार यांनी मतदान केले नाही. काँग्रेसचे अजय माकन (४७ मते), जी. सी. चंद्रशेखर (४५ मते), डॉ. सय्यद नासिर हुसेन (४७ मते) आणि भाजपचे उमेदवार नारायण सा. भांडगे (४७ मते) विजयी झाले आहेत. धजदचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले राज्यसभेचे माजी सदस्य डी. कुपेंद्र रेड्डी (३६ मते) पराभूत झाले. भाजप-धजद युतीनंतरचा हा त्यांचा दुसरा पराभव आहे.

विधान परिषदेच्या बंगळूर शिक्षक मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत लढलेले ए. पी. रंगनाथ यांचा पराभव हा युतीचा पहिला पराभव होता. एनडीएचा पक्ष असलेल्या धजदला दुसऱ्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे, पण काँग्रेसचे उमेदवार सलग दोन निवडणुका जिंकून एनडीएवर मात केली. या दोन्ही निवडणुका एनडीए आघाडीसाठी लिटमस टेस्ट होत्या आणि लोकसभा निवडणुकीसाठी त्याकडे कंपास म्हणून पाहिले जात होते. विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी आवश्यक आमदारांची संख्या विधानसभेत नव्हती, तरीही धजदने राज्यसभेची निवडणूक लढवली आणि ते तोंडावर पडले.

दोन आमदारांकडून भाजपला धक्का

बंगळूर : भाजपपासून अंतर राखणारे आणि अनेकदा काँग्रेस नेत्यांसोबत दिसणारे यशवंतपूरचे भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांनी भाजपचा व्हीप धुडकावून कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारास क्रॉस व्होटिंग केले तर भाजपचे दुसरे आमदार शिवराम हेब्बार (यल्लापूर) यांनी मतदानच केले नाही. त्यामुळे या दोन्ही आमदारांनी भाजप-धजद युतीला मोठा धक्का दिला आहे. भाजप नेत्यांनी याबद्दल संताप व्यक्त करून कारवाईचे संकेत दिले आहेत. काँग्रेसला तीन जागा आणि भाजपला एक जागा मिळाली.

काँग्रेसच्या पाच आमदारांची मते फोडण्याच्या उद्देशाने धजदने भाजपच्या मदतीने पाचवा उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांना रिंगणात उतरविले होते. त्यामुळेच आज निवडणूक झाली, परंतु काँग्रेस नेते आपल्या पक्षाच्या आमदारांना पक्षाशी एकनिष्ठ ठेवण्यात यशस्वी ठरले. उलट भाजपच्या दोन आमदारांना पक्षाविरुध्द उभे करण्यातही ते यशस्वी ठरले. मुख्यमंत्री सिध्दरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे रणतंत्र पुन्हा एकदा यशस्वी ठरले. भाजप आमदार एस. टी. सोमशेखर यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. भाजपच्या निवडणूक प्रतिनिधीने सोमशेखर यांनी काँग्रेसला क्रॉस व्होटिंग केल्याची पुष्टी केली.

मतदानापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमशेखर म्हणाले, ‘‘मी ११ वर्षांपासून सर्वांना मतदान केले आहे, पण जे राज्यसभेवर निवडून आले, त्यांनी आपल्याला एक रुपयाही निधी म्हणून दिला नाही. मी विवेकबुद्धीने मतदान केले आहे. गेल्या वेळी निर्मला सीतारामन यांना मतदान केले होते. त्यानंतर सीतारामन यांनी आपल्याला भेटण्याची वेळही दिली नाही.’’

सोमशेखर यांच्यावर कारवाई

सोमशेखर यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची पुष्टी देणारे चीफ व्हीप दोडण्णागौडा पाटील म्हणाले की, सोमशेखर यांची कृती पक्षविरोधी आहे. त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहोत. त्यांच्यावर काय कारवाई करायची, यावर भाजप आणि धजदच्या नेत्यांनी विधानसौध येथील विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात बैठक घेतली. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, एच. डी. कुमारस्वामी, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह नेत्यांनी बैठकीत कारवाईबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते. धजदचे सर्व १९ आमदार मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे स्पष्ट झाले. नाराज आमदार शरणगौडा कंदकूर यांच्या वाटचालीविषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य होते, परंतु त्यांनी अखेर आपल्या पक्षाच्या उमेदवारालाच मतदान केले.

मुख्यमंत्र्यांकडून आभार

सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भाजपचे यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार हे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे सांगण्यात येत होते; पण ते मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदानालाच आले नाहीत. हाही भाजपला एक धक्काच मानला जात आहे. भाजपचे माजी मंत्री, खाणसम्राट व विद्यमान आमदार जनार्दन रेड्डी यांनीही काँग्रेस उमेदवारालाच नियोजनानुसार मतदान केले.

पक्षवार झालेले मतदान

  • काँग्रेस - कॉंग्रेस आमदार १३४, अपक्ष आमदार ४, भाजप (क्रॉस व्होट) १ (एकूण १३९)

  • भाजप - ६४

  • धजद - धजद आमदार १९, भाजप १६ (एकूण ३५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT