नवी दिल्ली : तामिळनाडूमधील निलगिरी येथे भारतीय हवाई दलाच्या MI-17V5 हे हेलिकॉप्टरला बुधवारी भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १४ जण प्रवास करत होते. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. निलगीरी आणि काईम्बतूर दरम्यान ही दुर्घटना घडली.
MI-17V5 हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाचं सर्वाधिक सुरक्षित हेलिकॉप्टर्सपैकी एक मानलं जातं. भारतानं रशियाकडून ऐंशी MI-17 हेलिकॉप्टर्स खरेदी केले होते. २०११ मध्ये हे हेलिकॉप्टर्स भारताकडे पाठवण्यास सुरुवात झाली होती त्यानंतर सन २०१८ मध्ये सर्व हेलिकॉप्टर्स भारताकडे सुपूर्द करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या पाच वर्षात सहा वेळा या हेलिकॉप्टरचे अपघात झाले आहेत.
१) अरुणाचल प्रदेश -
१८ नोव्हेंबर २०२१ रोजी MI-17V5 हे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात लँडिंग दरम्यान कोसळलं होतं. यामधून प्रवास करणारे पाचही क्रू मेंबर्स बचावले होते त्यांना केवळ किरकोळ जखमा झाल्या होत्या. एअर मेन्टेनन्स चार्जिंग सुरु असताना ही दुर्घटना घडली होती. या अपघाताच्या तपासासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते.
२) केदारनाथ धाम -
सन २०१८ मध्ये केदारनाथ धाम इथं हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये इथेच या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. २३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी टेकऑफ करताना हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पायलटसह सहा लोक बचावले होते. या हेलिकॉप्टरनं केदारनाथहून गुप्तकाशीला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं.
३) जम्मू-काश्मीर -
२७ फेब्रुवारी २०१९च्या सकाळी १० वाजता जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत हवाई दलाच्या सहा अधिकाऱ्यांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, चौकशीत हे स्पष्ट झालं होतं की, हा अपघात निष्काळजीपणामुळं घडला होता. यावेळी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती.
४) केदारनाथ धाम -
३ एप्रिल २०१८ रोजी उत्तराखंडमधील केदारनथ धाम येथे MI-17 हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. गुप्तकाशीवरुन बांधाकामाचं साहित्य घेऊन येणारं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी ६० मीटर अंतरावरच दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या हेलिकॉप्टरमधून सहा जण प्रवास करत होते. यांपैकी एकाला किरकोळ जखम झाली होती, तर इतर सर्वजण सुरक्षित होते.
५) अरुणाचल प्रदेश -
६ मे २०१७ रोजी अरुणाल प्रदेशच्या तवांग जवळ हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरच्या उड्डाणापूर्वी दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातात पाच जवान शहीद झाले होते, तर इतर दोन जणांचा मृत्यू झाला होता. हवाई दलाच्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरने सकाळी सहा वाजता उड्डाण केलं होतं यानंतर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झालं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.