Odisha Train Accident  Esakal
देश

Odisha Train Accident : सरकारचं लक्ष केवळ आलिशान गाड्यांवर; विरोधकांचा केंद्रावर जोरदार हल्ला

संतोष कानडे

Coromandel Express Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी रात्री झालेल्या रेल्वे अपघातात आत्तापर्यंत 238 लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनचे 10 ते 12 डबे या धडकेनंतर उलटले आहेत. तर दुसऱ्या गाडीचे 3 ते 4 डबे रुळावरून घसरले आहेत.

या रेल्वे अपघातावर बोलतांना तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले म्हणाले की, सिग्नल बिघाडामुळे एवढा मोठा अपघात होणे यावर विश्वास बसत नाही. या अपघातामुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत ज्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. गोखले पुढे म्हणाले की, तिन्ही गाड्या एकमेकांवर कशा पडल्या हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी तर झालीच पाहिजे.

सीपीआय नेते बिनय विश्वम म्हणाले की, सरकारचा भर केवळ आलिशान गाड्यांवर आहे. सर्वसामान्यांच्या गाड्या आणि ट्रॅक दुर्लक्षित आहेत. ओडिशातील मृत्यू याचाच परिणाम आहे. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं की, रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्री राजीनामा देत असत. मात्र या प्रकरणात कुणीही काहीही बोलायला तयार नाही.

तीन गाड्यांचा अपघात?

2 जून रोजी संध्याकाळी बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस हावड्याकडे जात असताना अनेक डबे रुळावरून घसरले. शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली. यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबेही समोरून येणाऱ्या मालगाडीच्या डब्यांना धडकले. बालासोर जिल्ह्यातील बहाना बाजार स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

अपघातानंतर रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

हावडा : 033 - 26382217

खडगपूर : 8972073925, 9332392339

बालासोर : 8249591559, 7978418322

शालीमार (कोलकाता) : 9903370746

रेलमदद : 044- 2535 4771

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT