नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांना कोरोनाच्या (Corona) वाढत्या केसेसनंतर सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. गरज पडल्यास आवश्यक पावले उचलावीत. एएनआय वृत्तसंस्थेनुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र (Maharashtra) आणि मिझोराम या राज्य सरकारांना गेल्या आठवड्यात कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यावर पत्र लिहून कडक पावले उचलण्यास सांगितले आहे. (Corona Cases Increases In Delhi, Haryana And Other States)
तसेच जर गरज पडल्यास कारवाई करण्यास सांगितले आहे. भारतात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे १ हजार १०९ नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली. त्यानंतर संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ३० लाख ३३ हजार ६७ इतकी झाली आहे. दुसरीकडे सध्या ११ हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार शुक्रवारी ४३ रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यानंतर मृतांची एकूण संख्या ५ लाख २१ हजार ५७३ वर पोहोचली आहे. देशात संक्रमित दर ०.०३ टक्क्याच्या खाली घसरला आहे. दुसरीकडे रिकव्हरी रेट ९८.७६ टक्के झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.