गेल्या २४ तासात २ हजार २६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Corona Updates : नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनली आहे. बेड्स, औषधे, ऑक्सिजन यांचा तुटवडा भासत असून कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशभरात कोरोनाचा हाहाकार असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र लॉकडाऊन हा अखेरचा पर्याय असावा, असा सल्ला राज्यांना दिला होता. दिवसेंदिवस देशात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. सलग तीन दिवसांपासून तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी (ता.२२) तब्बल ३ लाख ३२ हजार ७३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून गेल्या २४ तासात २ हजार २६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी दिवसभरात १ लाख ९३ हजार २७९ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत भारतातील १ कोटी ६२ लाख ६३ हजार ६९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून १ कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी झालेल्या मृतांची संख्या पाहता लवकरच दोन लाखाचा टप्पाही ओलांडला जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८६ हजार ९२० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सध्या देशात २४ लाख २८ हजार ६१६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मृत्यूच्या आकडेवारीत भारताने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही भारताने मागे टाकलं आहे. कोरोनाला रोखण्याचा सध्यातरी एकच उपाय आहे तो म्हणजे लसीकरण. आतापर्यंत देशभरातील १३ कोटी ५४ लाख ७८ हजार ४२० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात १७ लाख ४० हजार ५५० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत २७ कोटी, ४४ लाख ४५ हजार ६५३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून गुरुवारी दिवसभरात ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर १.५३ टक्के इतका आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ६७ हजार १३ नवीन रुग्णांची नोंद झाली. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४० लाख ९४ हजार ८४० झाली आहे. गुरुवारी नोंद झालेल्या ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासात तर १५८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १०१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे. आजअखेरपर्यंत राज्यात एकूण ६ लाख ९९ हजार ८५८ सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, गुरुवारी ६२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४८ लाख ९५ हजार ९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख ९४ हजार ८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ७१ हजार ९१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार १४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.