Corona Test google
देश

कोरोनाचा संसर्ग वेगाने, चाचण्या वाढवा; केंद्राचे राज्यांना निर्देश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र आणि राज्यांना दिले निर्देश

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील (India) अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटल्याने केंद्र सरकारने आज चिंता व्यक्त केली . देशातील हा संसर्ग नियंत्रणात ठेवायचा असेल तर चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असून यामध्ये व्यक्तीकेंद्रीत कृती महत्त्वपूर्ण असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा (Aarti Ahuja) यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले असून यात त्यांनी काही विशिष्ट परिसरामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी व्यूहरचनात्मक विचार करून चाचण्या वाढविणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. (Corona infection is increasing rapidly Imp instructions given by Center to states)


जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) ‘ओमिक्रॉन’ला याआधीच ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ ठरविले असून सध्या देशभर त्याचा प्रसार होत असल्याकडेही आहुजा यांनी लक्ष वेधले. याआधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry of India) राज्यांना उद्देशून लिहिलेले ताजे पत्र आणि गृहमंत्रालयाने २७ डिसेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देतानाच आहुजा यांनी हा संसर्ग रोखण्यामध्ये चाचण्या वाढविणे हाच सर्वांत महत्त्वाचा घटक असल्याचे म्हटले आहे.

चाचण्या घटल्याचे उघड
आयसीएमआरच्या (ICMR) पोर्टलवरील डेटाकडे पाहिले तर अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चाचण्या घटल्याचे दिसून येते असे त्यांनी नमूद केले. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) १० जानेवारी रोजी कोरोना चाचण्यांच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे तातडीने विलगीकरण घडवून आणणे आणि रुग्णांची काळजी घेणे हे यामध्ये अधिक महत्त्वपूर्ण आहे.

चाचण्यांचा असाही फायदा
केवळ कोरोना चाचण्यांच्या माध्यमातूनच नवे क्लस्टर आणि हॉटस्पॉट शोधून काढले जाऊ शकतात, यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये वेगाने कारवाई करता येईल. संपर्कात आलेल्या लोकांची ओळख पटविणे, त्यांचे विलगीकरण घडवून आणणे आणि उपचारांचा सातत्याने पाठपुरावा करणे याबाबी खूप महत्त्वपूर्ण असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. केवळ चाचण्यांच्या माध्यमातून संसर्गावर लक्ष ठेवले जाऊ शकते यामुळे मृत्यूदर तर कमी होईलच पण त्याचबरोबर सहव्याधी असणाऱ्या रुग्णांचे संरक्षण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्यासाठीही चाचण्या महत्त्वाच्या
व्यूहरचनात्मक चाचण्यांच्या माध्यमातून कोरोनाला अधिक धोकादायक होण्यापासून रोखले जाऊ शकते. ज्यांना संसर्गाचा धोका अधिक आहे, अशांसाठी ही बाब खूप महत्त्वाची आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये लक्षणे आढळून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चाचण्या होणे गरजेचे आहे. ज्यांना संसर्गाची जोखीम अधिक आहे, त्यांच्यासाठी देखील चाचण्या ही महत्त्वाची गोष्ट आहे, असेही आहुजा यांनी नमूद केले.

असे निर्देश
देशातील ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढतोय
दाट लोकवस्तीच्या भागांवर विशेष लक्ष हवे
आयसीएमआरच्या बदलेल्या नियमांवर लक्ष हवे
गृह विलगीकरणाचा निर्णय विचारांती घ्यावा
लक्षणे नसलेल्यांच्या चाचण्या घेतल्या जाव्यात

ज्येष्ठांची काळजी हवी
कोरोनाच्या राष्ट्रीय कृती गटाने बाधित ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांबाबतचे सुधारित दिशानिर्देशही जारी केले आहेत, त्यात स्टेरॉईडचा अतिरेकी व सरसकट वापर अशा रुग्णांवर करू नये असा इशारा डॉक्टरांना देण्यात आला आहे. हलकी, मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्यात. जर तीन आठवडे सलगपणे खोकला कायम असेल तर त्या रुग्णांवर वेगळ्या पद्धतीने उपचार सुरू करावेत असेही यात म्हटले आहे. घशात खवखवणे व न थांबणारा खोकला ही ओमिक्रॉनच्या हल्ल्याची प्रारंभिक लक्षणे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

त्यांनी क्षयरोगाची चाचणी करावी
एखाद्या रुग्णामध्ये तीन आठवड्यांपेक्षाही अधिककाळ खोकला असेल तर त्याने तातडीने क्षयरोगाची चाचणी करून घेणे गरजेचे आहे. नव्या प्रोटोकॉलमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांना अतिजोखीम असलेल्या रुग्णांच्या श्रेणीमध्ये टाकण्यात आले आहेत. अशा रुग्णांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT