पुणे : गेल्या काही दिवसांपासून १० हजारांच्या खाली गेलेली कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसभरातील संख्येत आज काही प्रमाणात वाढ झाली. त्यानुसार, दिवसभरात १०,०६६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली. (Corona Update Slight increase in the number of corona victims in maharashtra)
आरोग्यविभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात १०,०६६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर ११,०३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आजवर राज्यात १,१९,३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आजवर ५९,९७,५८७ रुग्ण आढळून आले असून एकूण ५७,५३,२९० रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात सध्या १,२१,८५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, पुण्यात दिवसभरात २८३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर २५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ५४३७ रुग्णांची आज कोरोना चाचणी पार पडली तसेच ७ जणांचा आज मृत्यू झाला. दरम्यान, २३७५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून ३३१ रुग्ण गंभीर आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.