देशात आतापर्यंत २१ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
सातारा : देशातील काही खासगी रुग्णालये (private hospitals) केंद्राने लसीकरणासाठी नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन (vaccination guideliness) करीत बड्या हॉटेल्सच्या (hotels) सहकार्याने कोविड 19 लसीकरणासाठी (covid19 vaccination) पॅकेज देत आहेत. हे याेग्य नसल्याने त्यांच्याविरूद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारने शनिवारी (ता. 29) स्पष्ट केले आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने (ministry of health) राज्य व केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिम राबवताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, त्यांचे निरीक्षण करावे असा स्पष्ट आदेश अधिका-यांना दिला आहे. (corona-vaccination-news-private-hospitals-cant-offer-vaccine-packages-with-hotels-centre-to-states)
या मार्गदर्शक सूचनांनुसार शासकीयसह खासगी लसीकरण केंद्र येथे लसीकरण माेहिम राबवता येणे शक्य आहे. याबराेबरच वृद्ध व्यक्ती, दिव्यांग व्यक्तींसाठी माेहिम राबवावी. यासाठी गृहनिर्माण संस्था, पंचायत भवन, शाळा आणि महाविद्यालये, वृद्धाश्रम अशा ठिकाणी तात्पूरत्या स्वरुपात लसीकरणाची माेहिम राबविली जावी असेही आराेग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.
ज्या संस्था राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमेच्या मार्गदर्शक तत्वांची याेग्य पद्धतीने अंमलबजावणी करीत नसतील त्यांच्याविरूद्ध आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई व्हायला हवी असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
काही बड्या हॉटेल्सच्यानी कोविड लसीकरण पॅकेजेस जाहीर केली. त्यावर गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमातून माेठ्या प्रमाणात टीका झाली. या पॅकेजमध्ये मुक्कामासह, नाश्ता, जेवण, वायफाय सुविधा देण्याची ग्वाही दिली जात हाेती. याबराेबरच नामंवत रुग्णालयांनी लसीकरण आणि त्यानंतर सल्लामसलत अशी स्वरुपाची अमिष दाखविण्यास प्रारंभ केला. त्यावर देखील समाज माध्यमातून जाेरदार टीकेची झाेड उठली.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) यांनी शनिवारी (ता. 29) केंद्र सरकारकडे साठा नसताना खासगी रुग्णालयांना डोस कसे मिळत आहेत, याविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात लस उपलब्ध नसल्याने एका बाजूला 18 ते 44 वयाेगटातील लसीकरण माेहिम पुर्णतः थांबवावी लागली. दूसरीकडे खासगी रुग्णालयांना लस कशी उपलब्ध हाेत आहे.
दिल्ली सरकार सर्व युवकांना माेफत लस देण्यास तयार आहे. परंतु आम्हांला लस पूरविली जात नाही. खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु असले तरी प्रति व्यक्तींकडून एक हजार रुपये आकारले जात आहेत असेही सिसाेदीया यांनी नमूद केले.
दरम्यान आतापर्यंत २१ कोटींहून अधिक डोस देशात देण्यात आले आहेत. ही माेहिम जगातील सर्वांत माेठी मानली जात आहे. या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशाला लसी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.