COVID-19 Jn.1 Variant esakal
देश

COVID-19 Jn.1 Variant : प्रतिकारशक्तीलाही जुमानत नाही कोरोनाचा नवीन व्हेरिएंट; 'ही' पाच लक्षणं दिसली तर सावध व्हा

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी भारतामध्ये ५९४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

संतोष कानडे

Corona Virus Update : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी भारतामध्ये ५९४ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या २ हजार ३११ वरुन वाढून २ हजार ६६९ इतकी झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. कारण भारतात कोरोनाचे नवीन सब व्हेरिएंट जेएन.१चे रुग्ण आढळून येत आहेत. जेएन.१ हा व्हायरस ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BA.2.86 पासून बनला आहे. २०२२च्या सुरुवातीला बीए.२.८६ ने धुमाकूळ घातला होता. केवळ भारतातच नाही तर जेएन.१ कोरोना व्हायरस जगभरात झपाट्याने पसरत आहे.

नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी सांगितलं की, जेएन.१ व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. परंतु गंभीर प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत नाही. हा तोच व्हायरस आहे जो इतर देशांमध्ये पसरतोय.

WHOचं म्हणणं आहे की, JN.1 व्हेरिएंटचा आरोग्यावर होणारा परिणाम ओळखण्यासाठी आणखी अभ्यासाची गरज आहे. जेएन.१ मजबूत इम्युनिटी असलेल्यांनाही आपल्या जाळ्यात ओढत आहे. ज्या देशांमध्ये थंडी वाढतेय, त्यांनी सावध राहिलं पाहिजे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं की, हंगामी फ्लू, जसं की इन्फ्लूएंझा ए (एचआयएन १ आणि एच ३ एन २), एडेनोव्हायरस, राईनोव्हायरस आणि रेस्पिरेटरी सिंकाइटियल व्हायरसमुळे श्वसनाचं संक्रमण होऊ शकतं. शिवाय मान्सूनशी संबंधित इतर आजारांचं कारण बनू शकतं. कारण याची लक्षणंसुद्धा कोविड १९ प्रमाणेच आहेत.

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, जेएन.१ व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेमध्ये नवीन लक्षणांसोबत पसरु शकतो. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, गळ्यात खवखव, डोकेदुखी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाईनल लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT