Yogi Adityanath 
देश

योगींच्या आमदारांवर कोरोनाचा कहर; आतापर्यंत इतके मृत्यूमुखी

सकाळ डिजिटल टीम

रायबरेलीच्या सलोन विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी (वय ६४) यांचे आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले.

लखनौ- रायबरेलीच्या सलोन विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी (वय ६४) यांचे आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. गेल्या १९ एप्रिल रोजी लखनौच्या एसजीपीजीआय रुग्णालयाने त्यांना कोरोनामुक्त असल्याचे सांगत घरी सोडले होते. परंतु नंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मदतीने अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते आणि तेथे ते सात दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते.

दल बहादूर कोरी हे पहिल्यांदा १९९३ मध्ये आमदार झाले होते. त्यानंतर १९९६ मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले. राजनाथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ते मंत्री बनले. २००४ मध्ये दल बहादूर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र दहा वर्षांनी २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दमदार विजय मिळवला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी यांना विजय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. या कारणामुळेच स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय लोकांत दल बहादूर यांचा समावेश होता.

कोरोनामुळे उत्तर प्रदेशात आतापर्यंत सहा आमदारांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मंत्र्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच बरेलीचे आमदार केसर सिंह यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी ओरिया सदरचे भाजपचे आमदार रमेश दिवाकर लखनौ पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश श्रीवास्तव, योगी कॅबिनेटमधील कमल राणी वरुण, नागरी संरक्षण मंत्री चेतन चौहान यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

माजी मंत्री पंडित सिंह यांचे निधन

गोंडा जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री विनोद कुमार सिंह यांचे आज कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर लखनौत उपचार सुरू होते. पंडित सिंह यांना २१ एप्रिल रोजी बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना लखनौत दाखल करण्यात आले होते. तेथे सुधारणा झाल्यानंतर त्यांना गोंडाच्या एससीपीएस रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रकृती ढासळल्याने त्यांना पुन्हा लखनौला हलवले. तेथे एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT