breathing exercises 
देश

कोरोनात फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी श्वसनाचे 5 महत्त्वाचे व्यायाम; जाणून घ्या सविस्तर

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कोरोना महामारीनं (COVID19 Pandemic) संपूर्ण देशाला संकटात टाकलं. दररोज ४ लाखांच्या पुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. देशाच्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कोरोना विषाणू लोकांवर गंभीर परिणाम करत आहेत. हा विषाणू थेट लोकांच्या फुफ्फुसांवर (Lung Power) हल्ला करतो. त्यामुळे लोकांची श्वसनसंस्था (Breathing Exercises) निकामी होण्याचा धोका असतो. अशावेळी लोकांनी आपली श्वसनसंस्था सुरक्षित ठेवण्यासाठी काही टीप्स फॉलो करणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला असे काही व्यायाम प्रकार सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमची श्वसनसंस्था मजबूत होईल. (Coronavirus 5 Breathing Exercises To Improve Your Lung Power Amid COVID19 Pandemic)

१) खोल श्वास: हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा श्वास आहे. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात, तसेच रक्त प्रवाह सुधारतो, इम्युनिटी वाढते आणि ताण कमी होतो.

कसा करायचा व्यायाम- निवांत जमिनीवर बसा, मोठा श्वास घ्या. यावेळी श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याची वेळ मोजा. प्रत्येक श्वासागणिक वेळ वाढवा. २ के ५ मिनिटांपर्यंत हा व्यायाम करा.

२) डायफ्रामामॅटिक श्वास: यामध्ये ताण, राग कमी होण्यास मदत होते. लोक सहसा त्यांच्या फुफ्फुसांचा परिपूर्ण वापर करत नाहीत. या व्यायाम पद्धतीने फुफ्फुसांची श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते.

कसा करायचा व्यायाम- जमिनीवर रिलॅक्सपणे बसा. एक हात छातीच्या खाली आणि पोटाच्या वरती ठेवा. diaphragm याच ठिकाणी असते. मोठा श्वास घेऊन तो हळूहळू बाहेर सोडा.

3) हृदय व्यायाम-याचा फायदा तुम्हाला हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी होतो. यामुळे तुमच्या शरीरात अधिकप्रमाणात ऑक्सिजन घेतले जाते. यामध्ये जोरात चालणे, स्पॉट जॉगिंग, दोरी उड्या, पायऱ्या चढणे या व्यायाम पद्धतीचा समावेश होतो.

4) अनुलोम-विलोम: याला नाकपुड्यांचा श्वास असंही म्हटलं जातं. हा प्राणायमचा प्रकार असून हटयोगामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे श्वसनसंस्थेची शक्ती वाढण्यास मदत होते. रिकाम्या पोटी हा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

कसा करायचा व्यायाम- जमिनीवर किंवा खुर्चीवर बसा. उजव्या हाताचा अंगढ्याने तुमची उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. आता उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. तुमच्या मधल्या बोटाने आणि करंगळीच्या शेजारच्या बोटाने डावी नाकपुडी बंद करा. आता उजव्या नाकपुडीने श्नास घ्या. हीच प्रक्रिया वारंवार करा.

५) भ्रामरी- या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो माशी. ही गुंजन करण्याचा प्रकार असून यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो. यात तुम्ही तुमच्या अंगठ्याने कान बंद करा आणि मधले बोट आणि अनामिकेने डोळे बंद करा. तर्जनी भुवयांच्यावरती ठेवा आणि करंगळी गालावर ठेवा. श्वास घेताना माशीसारखा गुंजन्याचा (हम्म्म) आवाज करा. १० मिनिटांपर्यंत तुम्ही हा व्यायाम करु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North Assembly Election 2024 Results : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT