नवी दिल्ली Coronavirus : देशात आज तिसऱ्या लॉकडाउनची मुदत संपली आणि उद्या पासून देशभरात चौथा लॉकडाउन सुरू राहणार आहे. या लॉकडाउनची नियमावली केंद्र सरकारनं जाहीर केलीय. त्यात लॉकडाउनचे नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. देशातील 30 मोठी शहरं संपूर्णपणे लॉक करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील सात शहरांचा समावेश आहे. देशात संध्याकाळी सात ते सकाळी सात कर्फ्यू कायम असणार आहे. यात जिल्हा रेड झोनमध्ये असला किंवा नसला तरी, कर्फ्युचा हा नियम सगळ्यांनाच असणार आहे. दरम्यान, देशात एकूण रुग्णांची संख्या 90 हजार असून, गेल्या 24 तासांत 4 हजार 987 नवे रुग्ण सापडले आहेत.
काय बंद राहणार?
काय सुरू राहणार?
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यांना असतील अधिकार
केंद्र सरकारने लॉकडाउनची नियमावली जाहीर करताना, राज्य सरकारांच्या हातात काही अधिकार दिले आहेत. यात राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्हे ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे राज्य सरकारच्या हाती देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांचे निकष ठरविण्याचे आणि लॉकडाउन शीथिल करणे व न करण्याचे अधिकारही राज्य सरकारकडे असणार आहेत. दरम्यान, पंजाब, महाराष्ट्र आणि तमीळनाडू या राज्यांनी यापूर्वीच लॉक डाउनमध्ये 31 मेपर्यंत वाढ केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.