coronavirus india reports  esakal
देश

पुन्हा धोका वाढतोय! देशात 24 तासांत आढळले 20,408 नवे रुग्ण; 54 जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूची दररोजची आकडेवारी पुन्हा वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोरोना विषाणूची दररोजची आकडेवारी पुन्हा वाढत आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची (Coronavirus) दररोजची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) शनिवारी (30 जुलै) शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 20,408 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 20,958 रुग्ण बरे झाले आहेत. त्याच वेळी कोविडमुळं एकाच दिवसात 54 लोकांचा मृत्यू झालाय.

देशातील दैनंदिन सकारात्मकता दर 5.05 टक्क्यांहून अधिक आहे. आदल्या दिवशी भारतात 1,43,988 सक्रिय प्रकरणं नोंदवली गेली. 24 तासांत कोरोना सक्रिय प्रकरणांमध्ये 604 प्रकरणांची घट नोंदवण्यात आलीय. मंत्रालयानं म्हटलंय की, एकूण संक्रमणांपैकी 0.33 टक्के सक्रिय प्रकरणं आहेत. देशात कोरोना लसीकरणाची संख्या 2,03,94,33,480 आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 33 लाख 87 हजार 173 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

सध्या देशातील कोरोना रिकव्हरी रेट 98.48 टक्के असून एकूण रिकव्हरी डेटा 4,33,30,442 आहे. आता देशात कोरोनामुळं मरण पावलेल्यांची एकूण संख्या 5,26,312 झालीय. भारतात कोविड-19 महामारीमुळं पहिला मृत्यू मार्च 2020 मध्ये झाला होता. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नुसार, 29 जुलैपर्यंत कोरोनासाठी 87,48,11,197 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 4,04,399 नमुन्यांची शुक्रवारी चाचणी करण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT