नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे अनेक सेवा बंद आहेत, यामध्ये कशकर्तनालायाचाही समावेश आहे. लॉकडाऊनचा काळ मोठा असल्यामुळे अनेकांच्या केसांची व दाढीची समस्या निर्माण झाली आहे. यावर अनेकजण उपाय करताना दिसतात. मात्र, एका केंद्रीय मंत्र्याची दाढी त्यांच्या मुलाने केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची दाढी त्याचा मुलला चिराग पास्वाने केली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यामातून मुलाचे कौतुक केले आहे. चिराग पास्वान यांनी व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करताना म्हटले आहे की, 'काळ कठीण आहे. मात्र यातही एक उजेडाची बाब आहे. आपण इतरांची दाढी करू शकतो, याचे कौशल्य आपल्याकडे असू शकते, याचा साक्षात्कार मला लॉकडाऊनच्या काळात झाला. यामुळे अनेक घटना स्मरणात राहतील.'
व्हिडिओमध्ये रामविलास पासवान आपल्या घरात एका खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यांच्या अंगावर कपडा टाकून चिराग पास्वान इलेक्ट्रिक ट्रिमरच्या सहाय्याने दाढी कमी करीत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पंधरा दिवसापूर्वी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दाढीसह प्रसारमाध्यमांसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी केशकर्तनालय ही जीवनावश्यक बाब समजली जावी असे ट्विट केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.