coronavirus vaccine india dr. k vijayraghavan 
देश

कोरोना लसीबाबत महत्त्वाची बातमी; भारतात चार प्रकारच्या चाचण्या सुरू, शास्त्रज्ञांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात आपला विषारी प्रभाव वाढवत नेणाऱ्या कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी भारतात चार प्रकारे संशोधनांच्या माध्यमातून औषधे /लसी तयार करण्याचे प्रयत्न प्रगतिपथावर आहेत. मात्र एखाद्या औषधाची चाचणी यशस्वी झाली की लगेच दुसऱ्याच दिवसापासून त्याचा वापर सुरू होणे अशक्य असते, असे भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी आज सांगितले.

देशभरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

कोरोना रोगाविरुद्धची लढाई वैद्यकीय तंत्रज्ञान आणि औषधे/ प्रतिजैविके यांच्या बळावरच जिंकली जाईल आणि भारतात या दोन्हींचा वैज्ञानिक तसेच संशोधनात्मक पाया मजबूत आहे, असे निती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. पॉल यांनी सांगितले. 

डॉ. विजय राघवन यांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना लस तयार होण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा कालावधी भारताला आवश्यक आहे. ते म्हणाले की, कोविड-१९ विरुद्ध परिणामकारन ठरणारी लस शोधण्याचे संशोधन भारतात प्रगतीपथावर आहे आणि ते वेगवान पद्धतीने सुरू आहे. कोरोना लस शोधण्यासाठी जगभरात चार प्रकारांनी मुख्यतः संशोधन केले जाते. भारतातही याच प्रकारे मुख्यता संशोधन सुरू आहे. ऑक्टोबरपर्यंत याच्याशी संबंधित असलेल्या कंपन्या प्रो क्लिनिकल चाचण्यांच्या टप्प्यापर्यंत निश्चितपणे जाऊ शकतात. कोरोनावर औषध शोधण्याच्या प्रक्रियेत देशभरातील ३० वैज्ञानिक गट किंवा कंपन्या कार्यरत आहेत. मलेरिया, फ्ल्यू यासारख्या आजारांवरील औषधांमधील गुणधर्मांचे साधर्म्य कोरोना उपचारांवर काय असू शकते, यासंदर्भात शक्यता काही कंपन्या पडताळून पाहत आहेत. काही वैज्ञानिकांनी फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रोटीनची निर्मिती करून औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. देशी कंपन्यांबरोबरच कोरोना प्रतिरोधक औषध निर्मितीत गुंतलेल्या काही विदेशी कंपन्यांबरोबरही भारत या संशोधनात भागीदारी करत आहे. 

या संशोधन चाचण्या सुरू

  • एमआरएनए प्रकारची लस 
  • कोरोना विषाणूमधील कमजोर आणि ज्यामुळे त्याचा फायदा होत नाही अशा जनुकांच्या सहाय्याने तयार केले जाणारे औषध. 
  • एखाद्या अन्य माध्यमामध्ये चाचणी करून तयार केले जाणारे प्रतिजैविक. 
  • प्रयोगशाळेत विषाणू्च्या प्रथिनावर प्रयोग करून होणारी औषधनिर्मिती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT