coronavirus sakal
देश

Coronavirus : कोरोनाची लाट; आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पाठवले पत्र

कोरोना महामारीच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा नियमित पुरवठा त्वरित सुनिश्चित करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आज एका पत्राद्वारे केली आहे.

मंगेश वैशंपायन

कोरोना महामारीच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा नियमित पुरवठा त्वरित सुनिश्चित करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आज एका पत्राद्वारे केली आहे.

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या नवीन लाटेचा सामना करण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा नियमित पुरवठा त्वरित सुनिश्चित करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आज एका पत्राद्वारे केली आहे. शासकीय तसेच खासगी रूग्णालयांतील ऑक्सिजन संयंत्रे पूर्णपणे कार्यरत ठेवावीत आणि त्यांच्या तपासण्यासाठी नियमित ‘मॉक ड्रील' आयोजित करण्यात यावे, असेही पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या पहिल्या- दुसऱया लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही राज्यात एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नव्हता किंवा राज्यांनी तसे कळविलेले नाही असे आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत धडधडीत सांगितल्यावर मागच्या वर्षी कच गदारोळ झाला होता. सरकारी आकडेवारीनुसार पहिल्या दोन लाटांतील कोरोना मृत्यूसंख्या ५ लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र २०२० च्या मार्चपासून केंद्राने राज्यांना कोरोना रूग्ण व मृत्यूंबाबतची जी दैनंदिन आकडेवारी दिल्लीला पाठविण्यास सांगितले गेले त्यात मृत्यूची स्पेसिफिक कारणे लिहा, असे सांगितलेच गेले नव्हते व ही बाब सरकारने दडविल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर चीनमधून सुरू झालेल्या ताज्या लाटेच्या सुरवातीलाच केंद्राने ऑक्सिजन मुद्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना लिहिले आहे की आरोग्य सुविधांमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन म्हणजेच एलएमओची उपलब्धता आणि त्यांच्या पुनर्भरणासाठी (रिफिलिंग) पुरवठा साखळी कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुनिश्चित केली जावी. बॅकअप स्टॉकसह ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी यादी आणि मजबूत रिफिलिंग प्रणाली राखली जावी. व्हेंटिलेटर, बीआयपीएपी आणि एसपीओ -टू यंत्रणा यांसारखी उपकरणे आणि संबंधित वस्तूंची उपलब्धता याबाबत केंद्राला नियमित माहिती द्यावी व आवश्यकता असेल तर तत्काळ मागणी करावी.

ऑक्सिजनसाठी राज्यस्तरावर ऑक्सिजन नियंत्रण कक्ष पुन्हा कार्यान्वित करावेत, असे सांगून आरोग्य मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे की आरोग्य सुविधांच्या ऑन-बोर्डिंगची अंमलबजावणी करण्यासाठी दैनंदिन ऑक्सिजनची मागणी आणि वापराचे निरीक्षण केले जाईल.

दरम्यान परदेशातून येणाऱया प्रवाशांना सरसकट आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केलेली नसल्याचेही सरकारने स्पप्ट केले आहे. विमानतळांवरील कोरोना चाचण्या एच्छिक असतील. मात्र आता चीनसह पाच देशांतील प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. चीन, जपान, कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या सर्व विमानांच्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. यासोबतच या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही करण्यात येणार आहे.

कोरोनाचा उद्रेक झालेल्या देशांतून येणारा कोणताही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला त्वरित क्वारंटाईन करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय तसेच मुलकी विमानसेवांमधून प्रवास करणाऱ्या सर्व हवाई प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण झाले पाहिजे. सर्व प्रवाशांना उड्डाणां दरम्यान आणि प्रवेश बिंदूंवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागतील, मास्क अनिवाईय असतील व सामाजिक अंतरभानही पाळावे लागेल.

मांडविया यांनी सांगितले की विदेशांतून येणाऱया एखाद्या प्रवाशात कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला त्वरित विलीगीकरणात ठेवले जाईल. विमानतळांच्या एंट्री पॉइंटवरच सर्व प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग केली जाईल. या थर्मल स्क्रिनिंग दरम्यान प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याला वेगळे करून उपचारासाठी पाठवले जाईल. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधील सरासरी दोन टक्के प्रवाशांचे एच्छिक नमुनेदेखील घेतले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT