जी २० परिषदेपूर्वी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी अनेक मुद्यांवर चर्चा केली आहे. भारत १०० व्या स्वातंत्र्यदिनी एक विकसित आणि प्रगत राष्ट्र असेल. तसेच देशात भ्रष्टाचार, जातीवाद, जमातवाद याला कोणतीही जागा नसेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. न्यूज एजेन्सी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारत देश २०४७ मध्ये विकसीत देश असेल, असं मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले.(Latest Marathi News)
भारताच्या वेगवान विकासामुळे जगभरातील विविध देशांची भारतामध्ये रुची तयार होणे स्वाभाविकच आहे. अनेक देश भारताची विकास गाथा लक्षपूर्वक बघत आहेत. त्यासोबतच, 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल, असा विश्वास ही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला आहे.
सांगितला 'सी' आणि 'डी' चा अर्थ
पुढील दोन दशकांचा दृष्टिकोन अधौरेखित करत मोदी म्हणाले, 2047 पर्यंत भ्रष्टाचार (Corruption), जातीवाद (Casteism ) आणि संप्रदायिकता(Communalism) (3C) यांना आपल्या राष्ट्रीय जीवनात कोणतीही जागा नाही. विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याकडे लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता आहे आणि त्यामध्ये आता चौथा डी म्हणजे विकास समाविष्ट झाला आहे.(Latest Marathi News)
2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनेल भारत
प्रधानमंत्री मोदी म्हणाले, २०१४ च्या पहिले अनेक सरकारे आली पण ती अस्थिर होती आणि त्यामुळे काहीही महत्वपूर्ण कामे करण्यास असमर्थ ठरली. पण आता 2047 पर्यंत भारत विकसित होईल आणि अर्थव्यवस्था अधिक समावेशी आणि नवीन असेल. जनता व्यापक रूपात द्रारिद्र्याच्या विरोधात युद्ध जिंकेल. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील बदल स्पष्ट दिसतील. भ्रष्टाचार, जातीवाद आणि सांप्रदायिकता (3C ) यांचं आपल्या राष्ट्रीय जीवनात कुठेही स्थान राहणार नाही. भारतीयांची जीवन गुणवत्ता हि सर्वश्रेष्ट देशांबरोबर असेल यावर त्यांनी जोर दिला आहे.(Latest Marathi News)
प्राचीन काळापासून भारत जगाच्या मुख्य अर्थव्यवस्थेपैकी एक होता परंतु वसाहतवादामुळे, आपले जागतिक महत्व कमी होत गेले. परंतु, आता भारत पुन्हा एकदा वेगाने विकसित होत आहे. या दशकात १०व्या स्थानावरून ५व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत म्हणजे व्यवसाय हे आपण सिद्ध केले आहे, असे मोदी म्हणाले.
हि खूप मोठी संधी
२०४७ पर्यंतचा काळ हा विकासाचा पाया घालण्यासाठी एक मोठी संधी आहे. जेणेकरून पुढील एक १००० वर्षांनी देखील भारतचा हा विकास लक्षात राहील. मोदी पुढे म्हणाले, अंतराळ क्षेत्रातील आपलं यश जगभरात साजरं केलं जातंय. त्यासोबतच सगळ्याच वैश्विक क्रीडा आयोजनात भारत सगळे रेकॉर्ड तोडत आहे, असं मोदी म्हणाले.(Latest Marathi News)
जी 20 चे महत्व केले स्पष्ट
‘वसुधैव कुटुंबकम’ हि भारताची जी 20 अध्यक्षतेची थीम फक्त एक नारा नसून सांस्कृतिक लोकाचारातून प्राप्त झालेले एक व्यापक दर्शन आहे. निकटच्या काळात भारत पहिल्या ३ अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट होणार. आफ्रिकेला जी 20 मध्ये सर्वोच्च प्राथामिकता आहे आणि सगळ्या राष्ट्रांचे मत न घेता भविष्यातील कोणतीच योजना यशस्वी होणार नाही. सद्यस्थितीत महागाई ही प्रमुख समस्या आहे, असं मोदी म्हणाले.
जी 20 अध्यक्षांनी अशा काही योजनांना मान्यता दिली आहे, जेणेकरून एका देशातील महागाईचा परिणाम इतर देशांवर होणार नाही. भारताच्या या जी 20 अध्यक्षतेमुळे तिसऱ्या जगातील राष्ट्रामध्येही विश्वासार्हतेचे बीज रोवले जात असल्याचे ते म्हणाले.(Latest Marathi News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोन आता मानव-केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे. 'मला खात्री आहे की, 2047 पर्यंत आपला देश विकसित देशांत सामील होईल. भारत हा एक अब्जाहून अधिक भुकेल्या लोकांचा देश मानला जात होता. पण आता भारत हा एक अब्जाहून अधिक महत्त्वाकांक्षी विचारांचा, दोन अब्जाहून अधिक कुशल हातांचा आणि लाखो तरुणांचा देश मानला जातो आहे, असंही मोदी पुढे म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.