देश

कोरोनावर 2 DG औषध लाँच; जाणून घ्या सर्वकाही

दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनावर डीआरडीओने 2DG नावाचं औषध तयार केलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी 2DG च्या 10 हजार डोसची पहिली बॅच लाँच केली आहे.

सूरज यादव

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाच्या (Corona) महामारीने थैमान घातलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगात लसीकरण (Vaccination) मोहिम सुरु झाली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यात आता दिलासा देणारी गोष्ट म्हणजे कोरोनावर डीआरडीओने 2DG नावाचं औषध तयार केलं आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Harsh vardhan) यांनी 2DG च्या 10 हजार डोसची पहिली बॅच लाँच केली आहे. गेल्या वर्षभरापासून हाइड्रॉक्‍सीक्‍लोरोक्विन, रेमडिसिव्हीर, आयव्हरमेक्टिन यांसारखी औषधं दिली जातायत. दरम्यान, 2DG हे पहिलं औषध आहे जे अँटि कोविड ड्रग असल्याचं म्हटलं जात आहे. (covid 19 drdo 2dg medicine price dosage know all)

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेसनं 2DG औषधाची निर्मिती केली आहे. यामध्ये हैदराबादमधील डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या संशोधकांची महत्त्वाची भू्मिका आहे. DRL कडून सर्वसामान्यांसाठी हे औषध तयार करण्यात आलं आहे. पावडरच्या स्वरुपात हे औषध उपलब्ध असणार आहे.

गेल्या वर्षी भारतात पहिली लाट आली होती तेव्हाच या औषधावर काम सुरु झालं होतं. मे 2020 मध्ये डीसीजीआयने कोरोना रुग्णांवर या औषधाची दुसऱ्या टप्प्यात ट्रायल घेण्यास मंजुरी दिली होती. ऑक्टोबरपर्यंत ही ट्रायल सुरु होती. ट्रायलमध्ये कोरोना रुग्णांसाठी औषध सुरक्षित असल्याचं आणि उपचारात प्रभावी ठरल्याचं समोर आलं. त्यानंतर डीसीजीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिली होती. शेवटी ट्रायल डेटाच्या आधारे 9 मे 2021 रोजी डीसीजीआयने औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली.

औषध कसं काम करतं?

2 DG हे औषध अणुचं एक रूप आहे ज्यातून ट्यूमर, कॅन्सरच्या पेशींवर उपचार केले जातात. चाचणीमध्ये अशी माहिती समोर आली की, 2DG औषध कोरोनाच्या रुग्णांवर उपचारात प्रभावी ठरलं. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना यामुळे ऑक्सिजनची गरज कमी भासते. सध्या या औषधाचा सेकंडरी मेडिसिनप्रमाणे वापर करण्याची परवानगी दिली आहे. 2DG औषध बऱ्याच प्रमाणात ग्लुकोजसारखं आहे पण ग्लुकोज नाही. कोरोनाचा व्हायरस शरीरात घुसताच तो आणखी व्हायरसची निर्मिती करतो. ते रोखण्याचं काम औषध करते. व्हायरस या औषधाच्या ग्लुकोज अॅनालॉगमध्ये अडकतो. परिणामी कोरोनाचा शरीरात वाढणारा संसर्ग थांबतो.

ऑक्सिजनची गरज कमी भासणार

INMAS च्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 DG औषध कोरोनाला रोखतं. व्हायरसचा कोणताही व्हेरिअंट असेल तो शरीरात पसरण्यास सुरुवात करेल तेव्हा औषध त्याला थांबवेल. 2 DG औषध घेतल्यानंतर ऑक्सिजनची गरज वाढते कारण कोरोना वेगानं शरीरात पसरतो. एकदा कोरोनाचा व्हायरस शरीरात पसरण्यापासून रोखलं की आपोआप ऑक्सिजनची गरजही कमी भासेल.

डोस आणि किंमत किती?

2DG या औषधाचे किती डोस असणार आणि याची किंमत किती याचा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 2 DG हे एक सॅशेमध्ये उपलब्ध असणारं औषध आहे. जसं ओआरएस पाण्यात घालून पितात तसंच हेसुद्धा पाण्यातून घेता येईल. दिवसातून दोन वेळा हे औषध घ्यायचं असून कोरोनाच्या रुग्णाला पूर्ण बरं होण्यासाठी 5 ते 7 दिवसांपर्यंत हे औषध घ्यायला लागू शकतं. किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याचा निर्णय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच घेणार आहे. मात्र औषध स्वस्त असेल याची काळजी घेतली जाईल. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औषधाच्या एका सॅशेची किंमत 500 ते 600 रुपयांच्या आसपास असू शकते.

दुष्परिणाम होतात का?

औषध सोमवारी लाँच झालं असून ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झालं आहे. याचं उत्पादन वेगानं वाढवण्यात येत असून ते जास्तीत जास्त रुग्णांना कसं पोहोचेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. औषधाचे दुष्परिणाम आहेत का याबाबत विचारले असता डॉक्टर चंदना यांनी सांगितलं की, चाचणीवेळी नॉर्मल आणि गंभीर रुग्णांना हे औषध दिलं होतं. सर्व रुग्णांना या औषधाचा फायदा झाला. यापासून कोणतेही दुष्परिणाम झाल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे औषधाचे प्रतिकूल असे परिणाम होतात असं म्हणता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT