कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवलाय. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महिनाभरापासून देशात दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. कोरोनापासून (COVID-19) वाचण्यासाठी दोन मास्क वापरण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला. अशातच कोरोनाविरोधात आतापर्यंत आपली सर्वात मोठी ढाल ठरलेलं मास्कमुळे शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पीआयबीच्या (PIB) फॅक्ट चेक टीमनं या व्हायरल मेसेजची पडताळणी केली आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
"माणसाला दिवसभरात ५५० लीटर ऑक्सिजनची गरज असते जी नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या ऑक्सिजनच्या माध्यमातून भागवली जाते. मात्र मास्कच्या अडथळ्यामुळे आपण केवळ २५० ते ३०० लीटर ऑक्सिजन घेऊ शकतो. जास्त कालावधीपर्यंत चेहऱ्यावर मास्क लावल्यामुळे शरिरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजनची पातळी खालवते. त्यामुळे सतत मास्क वापरणे धोकादायक ठरु शकतं. सतत मास्क (Mask) वापरल्यामुळे गंभीर समस्येला सामोरं जावं लागू शकतं. " हा मेसेज सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकही या मेसेजवर विश्वास ठेवत असल्याचं समोर आलं आहे. पीआयबी (PIB)फॅक्ट चेकने या मेसेजची पडताळणी केली.
पीआयबीचं फॅक्ट चेक -
PIBFactCheck यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर वरील मेसेज फेक आणि चुकीचा असल्याचं सांगितलं आहे. PIB Fact Check ने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "मास्क वापरमुळे ऑक्सजन पातळी खालवत असल्याचा मेसेज फेक आणि बनावट आहे. यावर विश्वास ठेवू नये. हा दावा पूर्णतः खोटा आहे. याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी मास्कचा वापर आवश्य करा. सुरक्षित अंतर पाळणं आणि हात वारंवार धुणं हे उपाय परिणामकारक आहेत.
सोशल मीडियावर (Social Media) दररोज कोरोना महामारी (COVID-19) रोखण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. काही लोकं यावर डोळं झाकून विश्वास ठेवतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक बाब खरीच असेल असं नाही. त्यामुळे कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवण्यापूर्वी सत्य पडताळून पाहावं. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. यामध्ये अनेक अफवा या कोरोनावरील उपचारांशी निगडीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही माहितीची शहानिशा व सत्यता पडताळल्याशिवाय उपाय करु नका, असं वारंवार डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.