Corona In Children 
देश

बेंगलोरमध्ये विक्रमी गतीने लहानग्यांना कोरोनाचा विळखा; देशातही उच्चांकी रुग्णवाढ

सकाळवृत्तसेवा

बेंगलोर: कर्नाटकची राजधानी बेंगलोरमध्ये या महिन्याच्या सुरवातीपासून 26 मार्चपर्यंत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 470 हून अधिक मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. शहरात संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये तीव्र गतीने वाढ होताना दिसत आहे. मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण 228 मुली आणि 244 मुले एक ते 26 मार्चपर्यंत संक्रमित झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दररोज जवळपास 8 ते 9 मुले संक्रमित होत होते. मात्र, हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली आणि आता 26 मार्चपर्यंत ही संख्या 46 पर्यंत पोहोचली आहे. तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, आधीच्या तुलनेत आता लहान मुले संक्रमित होणाच्या धोका अधिक आहे. याचं कारण असं आहे की, कार्यक्रमांमुळे आणि काही इयत्तेच्या मुलांची शाळा सुरु झाल्याने अधिक मुले घराबाहेर पडत आहेत. मात्र, लॉकडाऊनदरम्यान हे होत नव्हतं. याबाबत माहिती देताना पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे तज्ज्ञ प्रोफेसर डॉक्टर गिरिधर आर बाबू यांनी म्हटलं की, शाळांचं उघडलं जाणं तसेच कार्यक्रमांमुळे अधिक धोका वाढला आहे. याआधी लॉकडाऊनमुळे धोका कमी होता मात्र आता तो वाढला आहे. 

त्यांनी म्हटलं की, अनेक प्रकरणांमध्ये तर लहान मुलांमुळे घरातील सदस्यांना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लहान मुलांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे कारण त्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं तसेच जास्त काळा मास्क परिधान करणं अवघड वाटतं. भलेही 10 वर्षे वयाखालील मुले शाळेत जात नसतील मात्र, ते इतर मुलांसोबत मैदानात अथवा बागेमध्ये खेळायला जातात. त्यामुळे प्रादुर्भावाची शक्यता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार,  भारतात एका दिवसांत 62 हजार 714 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 वर पोहचलीय. कोरोना संक्रमणामुळे गेल्या 24 तासांत 312 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींची संख्या 1 लाख 61 हजार 552  वर पोहचलीय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT