चीनसह जगातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं (China Coronavirus) वाढत असल्यामुळं भारतही आता सतर्क झालंय.
बंगळुरु : चीनसह जगातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं (China Coronavirus) वाढत असल्यामुळं भारतही आता सतर्क झालंय. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून, कोविड-19 ला रोखण्यासाठी 'मास्क' हा एकमेव उपाय असल्याचं बोललं जात आहे. लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालण्याचा सल्ला दिला जात आहे.
गुरुवारी कर्नाटकनं देखील राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाला मास्क घालणं बंधनकारक केलंय. यासोबतच कोविड-19 चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येत आहे. कोविड व्यवस्थापनाबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. कर्नाटकचे आरोग्य मंत्री सुधाकर (Health Minister Sudhakar) म्हणाले, 'कर्नाटकात केवळ 20 टक्के नागरिकांना तिसरा डोस मिळाला आहे. आता बूस्टर डोसची व्याप्ती 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची योजना आहे.'
चीनमध्ये कोविड-19 प्रकरणांची मोठी संख्या पाहता, कर्नाटकचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी राज्यात अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. सुधाकर यांनी सांगितलं की, 'सध्या कर्नाटकातील परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळं कोविड रुग्णांची चाचणी मोठ्या प्रमाणावर केली जाणार नाही. मात्र, कर्नाटक सरकार (Karnataka Government) बंगळुरू विमानतळावर कोविड रुग्णांची चाचणी करेल आणि कोविडच्या नवीन प्रकाराबद्दल जाणून घेण्यासाठी SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) कडं नमुने पाठवेल. याशिवाय, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तपासणी केली जाणार आहे. विमानतळावर काही लोकांची आधीच चाचणी केली जात आहे. दररोज 2 ते 3 हजार लोकांची कोविड-19 साठी चाचणी केली जात आहे.'
आरोग्य मंत्री पुढं म्हणाले, 'चीनसह अनेक देशांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत विविध जिल्ह्यांना कोरोनाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज 2 ते 3 हजार लोकांची कोविड-19 साठी चाचणी केली जाणार आहे. यादरम्यान सर्व जिल्हा रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी बेड राखून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच ज्यांना अद्याप बूस्टर डोस मिळालेला नाही, त्यांना बूस्टर डोस देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.