नवी दिल्ली : भारतीय आयडेंटीफीकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) ने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. UIDAI ने म्हटलंय की, आधार कार्डच्या हट्टापायी कुणाही नागरिकाला लस, औषध आणि हॉस्पिटल संदर्भातील कामांसाठी नाकारलं जाऊ शकत नाही. हा आदेश यासाठी काढण्यात आला आहे की, काही लोकांचं असं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्याकारणआने त्यांना लसीकरण तसेच इतर अन्य आवश्यक कामांमध्ये प्रचंड अडचणींना सामना करावा लागतो आहे. (Facilities can be provided without Aadhaar)
आधारशिवाय मिळू शकतात आवश्यक सेवा (Facilities can be provided without Aadhaar) :
UIDAI ने स्पष्टपणे म्हटलंय की, या कोरोना महासाथी दरम्यान प्रत्येकाला सेवासुविधा मिळणे आवश्यक आहे. मग कुणाकडे आधार कार्ड असो अथवा नसो. सोबतच UIDAI ने म्हटलंय की ज्या लोकांकडे आधार कार्ड नाहीये अथवा ज्यांना ऑनलाईन व्हेरिफिकेशन करण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी उपाय काढण्यासाठी UIDAI ने आधार संबंधित एजन्सी आणि डिपार्टमेंटवरुन आधार ऍक्ट 2016 च्या अंतर्गत सेक्शन 7 च्या सेवा जारी करण्यास सांगितल्या आहेत. UIDAI ने म्हटलंय की, कोणत्याही व्यक्तीला केवळ आधार नाहीये म्हणून सामान अथवा सेवा देत नसाल तर ते योग्य नाहीये. आधारशिवाय देखील आवश्यक काम आणि सेवा दिल्या जाऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.