covid vaccine covid vaccine
देश

मौल्यवान वस्तूंऐवजी चोरट्यांचा आता लसींवर डोळा; हैद्राबादेत 600 डोस चोरीला

या गुन्ह्यामागे व्यावसायिक चोरांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

निनाद कुलकर्णी

हैद्राबाद : आतापर्यंत आपण एखाद्या घटनेत चोरांना इतक्या लाखांचा मुद्देमाल चोरल्याचे किंवा लुटल्याचे वाचले अथवा पाहिले असेल, मात्र आता चोरांनी मौल्यावान वस्तू चोरण्या ऐवजी आता कोरोना लसीकरणासाठी (Covid Vaccination Theft In Hyderabad ) वापरण्यात येणाऱ्या लसींवरच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर चक्क 550 लसींच्या कुपी चोरून नेल्या आहेत. यामध्ये भारत बायोटेकच्या (Bharat Biotech ) कोव्हॅक्सिनच्या 300 हून अधिक तर, सीरमच्या (Serum Institute Of India) कोविशील्ड लसींच्या साधारण 250 कुपी चोरल्याचे सांगितले जात आहे. ही घटना हैद्राबाद येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यामागे व्यावसायिक चोरांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे. (Almost 550 Covid 19 Vaccination Stolen At Hyderabad )

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जामबाग (Jambagh PHC ) येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे. दरम्यान. रविवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या पीएचसी (PHC Center Jambagh) केंद्रात घुसून कोव्हॅक्सिन लसींच्या 300 हून अधिक कुपी, तर कोविशील्ड लसींच्या साधारण 250 कुपी चोरून पळ काढला, एवढेच नव्हे तर, चोरट्यांनी या केंद्रातील बीसीजी, डीपीटी आणि ओपीव्ही लसींसह संगणक आणि आवारात उभ्या असलेल्या ऑटोरिक्षांचे टायरही लुटून नेले.

सोमवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी (Covid 19 PHC Jambagh) जेव्हा कार्यालयात आले, त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यासाठी विशेष (Special Force) पथके नेमण्यात आली आहेत, अशी माहिती मिरचौक पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम अप्पाला नायडू यांनी सांगितले. (M Appala Naidu, Inspector, Mirchowk Police Station)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT