देश

बापरे! कोरोनामुळे झाला सिंहाचा मृत्यू; पर्यावरण मंत्रालयाकडून एडव्हायजरी जारी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतोच आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये कोरोनाचे सर्वाधिक 4 लाख रुग्ण फक्त एका दिवसांत आढळले आहेत. एका दिवसातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही 32 लाखांच्या पार गेली आहे. मात्र, आता याहून दु:खद अशी एक बातमी समोर आली आहे. कोरोनाचा व्हायरस आता जनावरांमध्ये देखील पसरत आहे. इतकंच नव्हे तर कोरोनाच्या संक्रमणामुळे एका सिंहांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे संक्रमण आता प्राण्यांमध्ये पसरलेलं असून ते मोठ्या प्रमाणावर पसरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता त्यादृष्टीने खबरदारीचे अनेक उपाय राबवण्यात येत आहेत.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कोरोनामुळे सिंहाचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच केंद्रीय मंत्रालयाने सर्व राज्यांना यासंदर्भात एक एडव्हायजरी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, सरंक्षित वन क्षेत्र तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हे भाग पर्यटकांपासून लांब ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय वन मंत्रालयाचे डीआयजी राकेकश जगेनिया यांनी ही एडव्हायजरी जाहीर केली आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि वन्यजीव विभाग मंत्रालयाच्या प्रसिद्धीनुसार, सरकारने राष्ट्रीय उद्याने व इतर संरक्षित भागात लोकांची हालचाल मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय उद्याने व त्याच्या आसपासच्या कर्मचारी / ग्रामस्थ इत्यादींच्या हालचालींबाबत जारी केलेल्या इतर सर्व अटी कायम ठेवण्याची विनंतीही मंत्रालयाने केली आहे. राष्ट्रीय उद्याने / अभयारण्य आणि इतर संरक्षित भागात प्राण्यांमध्ये प्राणघातक संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता तसेच मनुष्याकडून प्राणी व त्याउलट विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यताही या प्रकाशनात नमूद करण्यात आली आहे. विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पशु आपत्कालीन उपचारांसाठी आणि त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानी सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकड्यानुसार, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे नवे 4,01,993 प्रकरणे सापडली आहेत. यासहित एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,91,64,969 वर पोहोचली आहे. तर काल 3,523 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह एकूण आजवरच्या मृतांची संख्या ही 2,11,853 वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT