corona vaccination file photo
देश

भारतात लसीचं उत्पादन ८ कोटी पण फक्त पाच कोटी लोकांचं लसीकरण

सरासरी प्रतिदिन १६.२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले.

दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारतात लस उत्पादन (vaccine production) आणि प्रत्यक्ष लसीकरणाच्या आकड्यांमध्ये मोठा फरक दिसून येईल. भारतात दरदिवशी सरासरी २७ लाख लसींचे उत्पादन सुरु आहे. यामध्ये रशियन स्पुटनिक-व्ही (sputnik-v) लसीचा समावेश नाहीय. लसींचे उत्पादन आणि प्रत्यक्ष लसीकरणाचे आकडे बघितले, तर त्यामध्ये फरक दिसून येईल. मे च्या पहिल्या तीन आठवड्यात सरासरी प्रतिदिन १६.२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले. (Covishield output at 6 crore, Covaxin output at 2 crore doses/month yet only 5 crore will be given by May-end)

केंद्र सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये सिरम प्रतिमहिना कोव्हिशिल्डचे ६.५ कोटी डोस आणि भारत बायोटेक कोव्हॅक्सिनचे प्रतिमहिना २ कोटी डोसचं उत्पादन करत असल्याची माहिती दिली. जुलै महिन्यापासून कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढवून महिन्याला ५.५ कोटी डोसची निर्मिती करणार असल्याची माहिती देण्यात आली.

स्पुटनिकचे महिन्याला ३० लाख डोस बनवण्यात येतात. जुलैपासून हे उत्पादन १.२ कोटीपर्यंत वाढवणार असल्याची माहिती देण्यात आली. महिन्याला ६ ते ७ कोटी लस निर्मितीची आमची क्षमता असल्याचे सिरमकडून आधीच सांगण्यात आले आहे. भारत बायोटेकनेही एप्रिल महिन्यात २ कोटी आणि मे पर्यंत ३ कोटी उत्पादन क्षमता वाढवणार असल्याचे सांगितले होते. मे महिन्यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे मिळून ८.५ कोटी डोसचे उत्पादन होईल.

३१ दिवसांचा महिना पकडला, तर दिवसाला सरासरी २७.४ लाख लसीच्या डोसचे उत्पादन होईल. कोविन पोर्टलवरील लसीकरणाचे आकडे पाहिले, तर पहिल्या २२ दिवसात ३.६ कोटी लोकांचे लसीकरण झाले. म्हणजे दिवसाला सरासरी १६.२ लाख लोकांना लसीचे डोस देण्यात आले. म्हणजे याच वेगाने महिनाअखेरपर्यंत पाच कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT