cowin sakal media
देश

'Co-win Certificate' मध्ये चूक झालीये? जाणून घ्या अपडेटची प्रोसेस

शरयू काकडे

दिल्ली : तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नोंदणी केली असेल पण तुमचे नाव, जन्मतारीख किंवा इतर कोणतीही माहिती चुकली असेल तर? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आता ही माहिती कशी दुरुस्त होणार? काळजी करु नका! सरकारने तुमची ही समस्या सोडविली आहे.

भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरण उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका सरकारच्या कोविन पोर्टलची आहे. हे पोर्टल सतत अपडेट करून वापरण्यासाठी आणखी सहज आणि सुलभ करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. त्याच दृष्टीने सरकाराने नव्या कोविन पोर्टलवर एक फीचर अपडेट केले आहे. या फीचरमुळे तुमच्या सर्टिफिकेटमध्ये काही चुका झाल्या असतील तर अपडेट करू शकता.

नाव, जन्मतारीख, जेंडरबाबतच्या माहिती अपडेट करता येते

कोरोना लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना जर चुकून तुमचे नाव, जन्मतारीख, जेंडरबाबतची माहिती भरताना काही चूक झाली असेल किंवा लस घेतल्याच्या सर्टिफिकेटवर चुकीची माहिती दिसत असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता.

कोविन पोर्टलवर जाऊन चुकलेली माहिती दुरुस्त करू शकता. त्यानंतर लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर योग्य नाव, जन्मतारीख आणि जेंडरबाबतची बदल केलेली माहिती अपडेट होईल. तुम्हाला तुमच्या कोविन सर्टिफिकेटमध्ये अपडेट करण्याची फक्त एकच संधी मिळते त्यामुळे काळजीपूर्वक चुका दुरुस्त करा.

कोविन सर्टिफिकेटमधील चुका कशा दुरुस्त कशा कराव्यात

  • CoWin अॅप किंवा वेबसाईटला भेट द्या.

  • लॉग ईन आणि पासवर्ड टाका.

  • प्रत्येक सभासदाची माहिती डॅशबोर्डवर दिसेल.

  • त्यानंतर Raise Issue पर्यायवर क्लिक करा. दिलेल्या यादीपैकी सभासदाचे नाव निवडा

  • आता Correction of errors वर क्लिक करा.

  • तुम्हाला ज्या माहितीमध्ये (जेंडर, नाव, जन्मतारीख) दुरुस्ती करायची आहे, त्यात सुधारणा करुन अपडेट करा. सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्या. तुम्हाला ही माहिती बदलण्याची एकच संधी आहे हे विसरू नका. काळजीपूर्वक या गोष्टी अपडेट करा.

  • खात्री केल्यानंतर सर्व माहिती सबमीट करा.

  • केलेले बदल कोविन सर्टिफिकेटवर दिसतील, अन्यथा तुम्ही कोविन हेल्प लाईन नंबरवर कॉल करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT