crocodile conservation in Odisha Project in Bhitharkanika National Park  sakal
देश

Crocodile Conservation :ओडिशात मगरींच्या संवर्धनाला यश

भितरकणिका राष्ट्रीय उद्यानात प्रकल्प : मगरींची संख्या ९६ वरून एक हजारावर

सकाळ वृत्तसेवा

केंद्रपाडा : ओडिशातील भितरकणिका राष्ट्रीय उद्यानात मगरीच्या संवर्धनाला यश आले असून हा देशातील खाऱ्या पाण्यातील सर्वाधिक यशस्वी प्रयोग ठरल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. राज्याचे माजी वन्यजीव संशोधक आणि प्रख्यात पशुवैद्यक डॉ. सुधाकर कार यांनी या उद्यानातील मगरीच्या संवर्धनाबद्दल आयोजित चर्चासत्रात ही माहिती दिली.

केंद्रपाडा स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाने हे चर्चासत्र आयोजित केले होते. हे उद्यान देशातील खाऱ्या पाण्यातील सुमारे ७० टक्के मगरींचे निवासस्थान आहे. डॉ. कार यावेळी बोलताना म्हणाले, की ओडिशासह, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, प.बंगाल आदी राज्यांत ३४ ठिकाणी मगरीच्या खाऱ्या पाण्यातील प्रजातीसह मुगेर आणि घडियाल प्रजातींच्या प्रजनन संगोपन कार्यक्रमाला १९७४ मध्येच सुरुवात झाली.

सन १९७२ मध्ये वन्यजीव(संरक्षण) कायदा अस्तित्वात येईपर्यंत व्यावसायिक हेतूने मोठ्या प्रमाणावर शिकार केल्यामुळे मगरींना धोका निर्माण झाला होता. मगरीच्या या तिन्ही प्रजाती नदीमध्ये आढळणाऱ्या असून ७० च्या दशकात त्या नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि अन्न व कृषी संस्थेने (एफएओ) केंद्र सरकारच्या सहकार्याने मगर संवर्धन प्रकल्प हाती घेतला.

मगरींच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता. मगरींची मोठ्या प्रमाणावर शिकार झाल्याने मगरींच्या पिल्लांचे जगण्याचे प्रमाण कमी झाल्याने बंदिस्त प्रजनानाद्वारे मगरींची संख्या वेगाने वाढविण्यावरही भर देण्यात आला, असेही डॉ. कार यांनी यावेळी नमूद केले.

या प्रकल्पामुळे मगरींची संख्या वाढण्यास मदत झाली. १९७४ मध्ये केवळ ९६ वर असलेली संख्या १९९५ मध्ये १,०००वर जाऊन पोचली. त्यामुळे, वन खात्याने मगर संगोपन कार्यक्रम थांबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर प्रत्येक वर्षी उबवणी व संगोपन केंद्रात ठेवण्यासाठी मगरीची अंडी गोळा केली जात होती. यावर्षीच्या सुरुवातीला केलेल्या गणनेनुसार उद्यानातील मगरींची संख्या १,७८४ वर गेली आहे.

मगरी आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक असून, त्या नदीचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात मदत करतात. नदी, ओढ्यातील मगरींच्या भीतीमुळे स्थानिक, वृक्ष तोडणारे खारफुटीच्या जंगलापर्यंत पोचू शकत नसल्याने ती सुरक्षित राहतात.

- डॉ. बसंती शुक्ला,केंद्रपाडा महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT